अमित शहांचा पुणे दौरा : बॅनरबाजी, काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड; NEET पेपरफुटी आणि CJP आंदोलनावर बोलणार का? सर्वांचे लक्ष
राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी अमित शहा पुण्यात; राजकीय वातावरण तापले
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या भेटीमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला अमित शहा प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. मात्र या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर CJP आंदोलन, NEET पेपरफुटी प्रकरण, जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, काँग्रेसचा विरोध आणि शहरातील बॅनरबाजी यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष पुण्याकडे लागले आहे.
अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान ते NEET पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. CJP आंदोलनानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला असून, काँग्रेससह विविध पक्षांनी अमित शहा यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार
लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान होणार असून, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Related News
मोदी-शाहांवर संजय राऊतांचा घणाघात; “2029 पूर्वीच सत्ता हादरेल”
UPSC चा पेपर कधी फुटत नाही, मग NEETचाच का?; सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल
“भक्त बनू नका, मोकळ्या मनाने विचार करा”; गावी पोहोचताच सोनम वांगचुक यांचा मोठा संदेश
Gold Price Today : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल; 10 ग्रॅमचा ताजा भाव किती?
CWG 2026 : भारताची एका दिवसात 6 पदकांची कमाई; अस्मिता डेचा इतिहास, नीरज चोप्राला रौप्य
Gen Z ला आवडणाऱ्या एनर्जी ड्रिंकवर सरकारचा मोठा निर्णय; आता बदलणार बाटल्यांवरील लेबल
JSW ची भारतीय ऑटो मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री! 5 नव्या SUVs मुळे Creta, Thar, Fortunerची वाढणार डोकेदुखी
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 1000 मुलींना सुकन्या समृद्धीचे धनादेश; दरवर्षी 20 हजार, 10 वर्षे सरकार भरणार पैसे
मेनोपॉजमध्ये महिलांनी आहाराची काळजी घ्या! हाडे, हृदय आणि हार्मोन्ससाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर
अमित शहा काल रात्री पुण्यात दाखल झाले. ते मुक्कामी असलेल्या रिट्झ-कार्लटन हेरिटेज हॉटेल परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांच्या ताफ्यातील सर्व वाहनांची डॉग स्कॉड आणि बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून शहरातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.
पुण्यात बॅनरबाजीची जोरदार चर्चा
अमित शहा यांच्या स्वागतासाठी पुण्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनर लावण्यात आले आहेत. काही बॅनर्सवर “भारताचे चाणक्याचे शौर्यभूमीत स्वागत” असा मजकूर झळकत आहे. या स्वागत बॅनर्समुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दुसरीकडे काँग्रेसच्या समर्थकांकडूनही उपरोधिक बॅनरबाजी करण्यात आली आहे. “तुमचे ते लेकरू आणि आमचं ते कार्ट” अशा आशयाचे फलक शहरात लावण्यात आल्याने त्यांची मोठी चर्चा रंगली. काही वादग्रस्त बॅनर्स प्रशासनाने हटवल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड; पोलिसांवर गंभीर आरोप
अमित शहा यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसने निषेध आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अनेक पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून काहींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, काल रात्रीपासून १०० ते १५० काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. मागील तीन दिवसांपासून पोलिसांकडून कार्यकर्त्यांना नोटिसा देणे, चौकशीसाठी बोलावणे आणि ताब्यात घेण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रशांत जगताप म्हणाले की, भाजप पोलिसांचा वापर करून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलन होणार नाही, असा दावा करणारे आता आंदोलनामुळे घाबरले आहेत. विद्यार्थ्यांवरील कथित अन्याय आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर हा निषेध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचा पलटवार; “काँग्रेसला जशास तसे उत्तर”
काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काँग्रेसला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ भाजपचे कार्यकर्ते एकत्र येणार असून, काँग्रेस ज्या परिसरात आंदोलन करणार आहे त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्तेही उपस्थित राहतील. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती भूमिका पार पाडावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनात अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्यास भाजपकडूनही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
NEET पेपरफुटी आणि CJP आंदोलनावर अमित शहा बोलणार?
दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर आणि त्यावरील पोलिसांच्या कारवाईमुळे केंद्र सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे. NEET पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज यावरून देशभरात राजकीय वातावरण तापले आहे.
अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यातील कार्यक्रमादरम्यान या मुद्द्यांवर भूमिका मांडणार का, याकडे राजकीय विश्लेषक, विद्यार्थी आणि विरोधी पक्षांचे विशेष लक्ष लागले आहे. सध्या त्यांच्या अधिकृत कार्यक्रमात या विषयावर भाषणाचा उल्लेख नसला तरी, माध्यमांच्या प्रश्नांना ते उत्तर देतात का, याबाबत उत्सुकता आहे.
पुण्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था
अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पुणे पोलिसांनी संपूर्ण शहरात मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात केला आहे. हॉटेल परिसर, पुरस्कार सोहळ्याचे ठिकाण आणि प्रमुख मार्गांवर अतिरिक्त पोलीस दल, बॉम्बशोधक पथक, डॉग स्कॉड तसेच वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राजकीय आंदोलन, निषेध मोर्चे आणि संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
एकीकडे राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा, दुसरीकडे काँग्रेसचा निषेध, भाजपची प्रतिआंदोलनाची भूमिका आणि CJP आंदोलनानंतर निर्माण झालेली राजकीय पार्श्वभूमी यामुळे अमित शहा यांचा पुणे दौरा हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता राज्यातील सर्वाधिक चर्चेचा राजकीय विषय ठरला आहे. आता या दौऱ्यातून कोणते राजकीय संदेश दिले जातात आणि NEET पेपरफुटी तसेच विद्यार्थी आंदोलनाबाबत अमित शहा काही भूमिका मांडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
