Sanjay Raut: वांगचुक यांचे उपोषण सुटले, पण… संजय राऊतांचा सरकारला खणखणीत इशारा; म्हणाले, ‘आता आंदोलन थांबणार नाही’
मुंबई : पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर आपले आमरण उपोषण मागे घेतले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात जाऊन Sonam Wangchuk यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. नड्डा यांच्या हस्ते ज्यूस पिऊन वांगचुक यांनी उपोषण सोडले. मात्र, त्यांच्या या निर्णयानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात असून, सोनम वांगचुक यांच्या उपोषणानंतरही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा दावा केला जात आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मात्र, त्याचवेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत सरकारला गंभीर इशाराही दिला आहे. वांगचुक यांनी उपोषण सोडले असले तरी देशातील आंदोलन आता थांबणार नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे.
‘उपोषण सोडले याचा आनंद, पण…’
Sonam Wangchuk: यांनी जंतर-मंतरवर सर्व आंदोलकांच्या उपस्थितीत उपोषण सोडले असते, तर देशातील नागरिकांना अधिक आनंद झाला असता, असे संजय राऊत यांनी म्हटले. ज्या सरकारविरोधात वांगचुक यांनी 26 दिवस उपोषण केले, त्याच सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले आणि त्यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले, यावर राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला.
Related News
आंदोलन यशस्वी करण्यासाठी आणि सरकारच्या धोरणांविरोधात विविध पक्ष आणि संघटना एकत्र आल्या होत्या. त्यामुळे या आंदोलनातील एखादा प्रतिनिधी उपोषण सोडताना उपस्थित असायला हवा होता, असे राऊत म्हणाले. किमान कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके किंवा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासारखे नेते तिथे उपस्थित असायला हवे होते, असेही त्यांनी सांगितले.
‘सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या?’
Sonam Wangchuk यांनी नेमक्या कोणत्या अटींवर उपोषण मागे घेतले, याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. वांगचुक यांच्या आंदोलनाची मुख्य मागणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होती. जोपर्यंत प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती.
मात्र, आता उपोषण मागे घेतल्यानंतर या मागणीचे काय झाले, हे सरकारने आणि Sonam Wangchukयांनी देशाला स्पष्ट करणे आवश्यक आहे, अशी मागणी राऊत यांनी केली. धर्मेंद्र प्रधान यांना सरकार का वाचवत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘जर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य झाली नसेल, तर सोनम वांगचुक यांच्या 26 दिवसांच्या उपोषणाचे काय झाले?’ असा सवाल करत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला.
‘आता आंदोलन थांबणार नाही’
Sonam Wangchuk यांच्या आंदोलनामुळे देशातील शिक्षण व्यवस्था आणि सरकारच्या कार्यपद्धतीविरोधात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे राहिले आहे. हे आंदोलन आता थांबणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
देशातील अनेक विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विविध आंदोलनं सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले.
मुंबईतही आंदोलनाची तीव्रता वाढत असून, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रगान आंदोलन करण्यात येत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच 26 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘सरकार चर्चेला घाबरतंय का?’
Sonam Wangchuk यांचे उपोषण मध्यरात्री संपवण्यात आल्याने विरोधकांकडून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रक्रियेत विरोधी पक्षांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत असले, तरी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांनी चर्चेची मागणी करूनही सरकारने त्याला प्रतिसाद दिला नाही, असा आरोप राऊत यांनी केला. शेतकरी प्रश्न, विविध सामाजिक मुद्दे आणि इतर राष्ट्रीय विषयांवर चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र सरकारने त्यापासून पळ काढल्याचे ते म्हणाले.
आता आंदोलन हाताबाहेर जात असल्याची भीती सरकारला वाटू लागल्याने आंदोलन संपवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.
पंतप्रधान मोदींवरही निशाणा
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्यरात्रीच्या सोशल मीडिया संदेशावरही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी साधारणपणे रात्री आठ वाजता देशाला संबोधित करतात, मात्र यावेळी ते मध्यरात्री सोशल मीडियावर आले, असा टोला राऊत यांनी लगावला.
देशातील परिस्थिती आणि वाढता जनक्षोभ पाहून सरकार अस्वस्थ झाल्याचा दावा करत, सरकारला आंदोलनाची भीती वाटत असल्याचेही राऊत म्हणाले.
