अकोला: राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखान्यात ‘हेल्थ एटीएम मशीन’
कार्यान्वित करण्यात आले असून, याच्या मदतीने नोंदणीकृत विमाधारक कामगारांना
आरोग्य तपासणीसाठी अत्याधुनिक व विनामूल्य सुविधा उपलब्ध होणार आहे.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
या यंत्रणेचे उद्घाटन भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
अकोल्यातील तीन ठिकाणी हे हेल्थ एटीएम मशिन बसवण्यात आले आहे,
ज्याचा लाभ सुमारे 20,000 नोंदणीकृत कामगारांना होणार आहे.
या अत्याधुनिक यंत्राद्वारे खालील गोष्टींची तपासणी केली जाऊ शकते:
- उंची, वजन, बीएमआय (BMI)
- बॉडी फॅट, मसल मास, त्वचेखालील चरबी
- व्हिसरल फॅट, बॉडी वॉटर, प्रोटीन
- बीएमआर (Basal Metabolic Rate), बोन मास, मसल रेट
- शरीराचे तापमान, रक्तदाब, ब्लड ऑक्सिजन
- दृष्टी तपासणी
- हिमोग्लोबिन, एचबीएवनसी (HBA1C), लिपिड प्रोफाइल
राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखान्यात नोंदणीकृत विमाधारकांना:
- विनामूल्य औषधोपचार
- वैद्यकीय तपासणी
- वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती
आदी सुविधा पुरवल्या जातील.
या यंत्रणेच्या माध्यमातून कामगारांना त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करता येणार असून,
यामुळे वेळेवर निदान होऊन आजारांचे व्यवस्थापन सुलभ होणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामगारांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
हेल्थ एटीएम मशिन्समुळे कामगारांच्या आरोग्य सुधारण्याबरोबरच, वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/car-affilting-char-thar-char-wounds-borgav-manju-campus-accident/