पातुर नंदापूर, १३ जानेवारी २०२५ (सोमवार)
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाकंभरी पौर्णिमेनिमित्त पातुर नंदापूर येथील श्रीक्षेत्र ऋषी महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
पातुर नंदापूर गावापासून १ किलोमीटर अंतरावर नैसर्गिक, पुरातन, आणि चमत्कारी वातावरणामध्ये वसलेले हे तीर्थक्षेत्र भक्तांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते.
Related News
कोल्हापूरी बंधारा ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
- By Yash Pandit
मराठी सिनेमा ‘जिलबी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
- By Yash Pandit
पोलीस स्टेशनमध्ये घुसला विषारी नाग; सर्पमित्रांनी दिले जीवदान
- By Yash Pandit
जानोरी-मेळ घाटातून वाळू तस्करांची दादागिरी; महसूल प्रशासन डोळेझाक
- By Yash Pandit
कुटासा ते दहीहांडा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची त्रेधातिरपीट; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी
- By Yash Pandit
मोटरसायकलस्वारास अज्ञात आयशर वाहनाने उडवले; स्वार गंभीर जखमी
- By Yash Pandit
अकोल्यातील चोहट्टा बाजार येथील बारमध्ये मोबाईल चोरीचा प्रकार
- By Yash Pandit
मकरसंक्रांतीनिमित्त ‘पक्षी वाचवा’ विशेष सत्राचे आयोजन
- By Yash Pandit
ऑनलाइन फसवणुकीचा फेक “किसान अँप” प्रकरण अकोल्यात उजेडात
- By Yash Pandit
बाल विकास प्रकल्प शहरीतर्फे पालक मेळावा व सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
- By Yash Pandit
धोकादायक वळणावर अपघात; दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
- By Yash Pandit
अस्वलाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी; अकोल्यात उपचार सुरू
- By Yash Pandit
श्रीक्षेत्र ऋषी महाराज तीर्थक्षेत्रावर १४२ वर्षांपूर्वी रामकृष्णजी पुंडे यांच्या शेतामध्ये उंच टेकडीवर एक प्राचीन मोहाचे झाड आहे.
या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये शेकडो वर्षांपासून बाराही महिने चार फूट अंतरावर पवित्र तीर्थरूप पाणी असते. हे पाणी कधीही आटत नाही,
जरी परिसरात दुष्काळ असला तरीसुद्धा.भक्तांची अशी श्रद्धा आहे की, या झाडातील तीर्थ पिण्याने मनोकामना पूर्ण होतात आणि अंगाला लावल्यास चर्मरोग बरा होतो.
ऋषी-मुनींनी येथे तपस्या केल्यामुळे या झाडामध्ये पाण्याचा उगम झाला असल्याचा भाविकांचा विश्वास आहे.
यंदा श्री ऋषी महाराज यात्रा महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत: सकाळी ९:३०
वाजता: होम पूजनाचा कार्यक्रम ११:०० वाजता: ह. भ. प. प्रभुदास महाराज वानखडे यांचे काल्याचे कीर्तन दुपारी १:०० ते ४:००:
महाप्रसाद सायंकाळी ५:००: गावातून शोभायात्रा यात्रेनिमित्त खालील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे: आरोग्य शिबिर:
सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० बचत गट साहित्य विक्री व प्रदर्शनी भजनी मंडळ, लेझीम, ढोल, दिंडी भजनाचे कार्यक्रम
श्री तीर्थक्षेत्र ऋषी महाराज यात्रेमध्ये सहभागी होऊन पवित्र तीर्थ व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (विकास ठाकरे)
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/tremendous-trailer-of-marathi-cinema-jilbi-released/