पातुर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि निवडणूक सचिव सुरेश काकाणी यांनी गुरुवारी (४ जून) पातुर येथे भेट देऊन निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी पातुर नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, निवडणूक निर्णय अधिकारी तथा बाळापूर उपविभागीय अधिकारी संतोष येवलीकर, पातुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ए. बी. गडलिंग, तहसीलदार डॉ. राहुल वानखडे, पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवार तसेच नगरपरिषद व महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे व सचिव सुरेश काकाणी यांचे स्वागत केले. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत, मतदान केंद्रांची तयारी, सुरक्षा व्यवस्था, मनुष्यबळ नियोजन आणि आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
Related News
गेवराईतील दुर्दैवी घटना; हुंडा आणि पैशांसाठी छळ झाल्याचा आरोप
बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात एका 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्का...
Continue reading
82 वर्षीय आजोबा स्कूटीवर निघाले अन् थेट खंडाळ्यात पोहोचले; विस्मरणामुळे कुटुंबीयांची धावपळ, पोलिसांच्या सतर्कतेने टळला अनर्थपुणे : आधुनिक तंत्रज्ञान,...
Continue reading
अकोट : तालुक्यातील बोर्डी, शिवपूर, रामापूर परिसरात मान्सूनपूर्व कपाशी लागवडीला वेग आला आहे. सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणा...
Continue reading
मोठा धक्का! 4 जूनला पुण्यातील 50 हून अधिक भागांचा पाणीपुरवठा पूर्ण बंद; 2 दिवस कमी दाबाने पाणीपुणे, 3 जून: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दैन...
Continue reading
धक्कादायक! खडकवासला कालव्यात बुडून एअर फोर्सच्या 41 वर्षीय सार्जंटचा दुर्दैवी मृत्यूपुण्यातील खडकवासला परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली ...
Continue reading
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचे थैमान; घरांची पडझड, जनावरे जखमी
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा भीषण तडाखा; घरांवरील टीनपत्रे उडाली, जनावरे जखमी, अन...
Continue reading
तुकाराम मुंडेंचा मोठा धडाका! 11 लाखांचे आंबे जप्त; 37 जण अटकेत, 31 दुकाने सीलअन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्व...
Continue reading
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; 3 वाहनांच्या धडकेत 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 3 गंभीर जखमी
महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या...
Continue reading
महाराष्ट्राच्या महामार्गांवर मृत्यूचे तांडव; एकाच दिवशी 3 भीषण अपघात, दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत
महाराष्ट्रातील विविध महामार्गांवर सोमवारी घडलेल्या तीन भीषण रस्ते अपघातांनी संप...
Continue reading
मुंबईवर भीषण जलसंकट! 7 तलावांपैकी एक पूर्ण कोरडा, फक्त 40 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक
मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला पाणीपुरवठा...
Continue reading
यावेळी आयुक्त व सचिव यांनी पातुर शहरातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदानासाठी करण्यात आलेल्या व्यवस्था तसेच मतदारांना कोणत्याही अडचणीशिवाय मतदान करता यावे यासाठी करण्यात आलेल्या तयारीची त्यांनी माहिती घेतली.
आढावा बैठकीदरम्यान निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मतदान प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन केले.या दौऱ्यामुळे पातुर नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीला अधिक गती मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
read also : https://ajinkyabharat.com/case-filed-against-suspended-deputy-superintendent-in-case-of-misbehavior-in-akolyateel-land-records-department/