कुरणखेडमध्ये सर्व समाजाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना सामूहिक अभिवादन; सामाजिक एकतेचा दिला संदेश!
कुरणखेड : थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कुरणखेड येथे सर्व समाजाच्या वतीने सामूहिक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माळीपुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. विविध समाजांतील नागरिकांनी एकत्र येत महात्मा फुले यांना अभिवादन करून सामाजिक एकतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचेही पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा उमाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजसेवक विशाल उमाळे तथा सर्व बांधवांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सलीम बेग मिर्झा, दिनेश बोळे, किरण उमाळे, शेख रसूल, पोलीस पाटील जामणीक, रंजीत घोगरे, राम उमाळे, उमेश आटोटे, ईश्वर हरणे, राम धानोरकर, राजेंद्र इंगळे, अरुण इंगळे, दर्शन इंगळे, लक्ष्मण राऊत, स्वप्निल राऊत, पंढरी गायकवाड, विजय निकाळजे, संदीप चव्हाण, गौतम मोहोड, विनोद उमाळे, प्रतिक उमाळे, विकी उमाळे, अजय वानखडे, सचिन मोहोड, मनीष मेश्राम, जयकुमार दामोदर, समाधान आटोटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related News
महात्मा फुले पुण्यतिथीला सामाजिक बांधिलकी जपली! गरजू विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी बचत गटाची ११ हजारांची मदत
हिवरखेड : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिम...
Continue reading
डिलिमिटेशनवरून फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल! DMK ते शरद पवारांच्या पक्षाचा पाठिंबा असल्याचा दावा; दक्षिणेतील ७५ खासदारांचा उल्लेख
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलि...
Continue reading
भारताची कृषी क्षेत्रात ऐतिहासिक भरारी! तांदूळ उत्पादनात चीनला टाकले मागे; अन्नधान्य उत्पादनाने गाठला नवा विक्रम
भारतीय कृषी क्षेत्रासाठी आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. ...
Continue reading
राहुल गांधींचा शरद पवारांबाबत मोठा खुलासा! विधेयकाला पाठिंबा दिला तरी इंडिया आघाडीत स्थान कायम; काँग्रेसमधील नाराजीवर काय म्हणाले?
Rahul Gandhi On Sharad Pawar : केंद्र सरकारच्या ...
Continue reading
Gold-Silver Price Surge : दोन दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी! सोनं ४,२१३ रुपयांनी महागलं, तर चांदीत १० हजारांची वाढ; सराफा बाजारात खळबळ
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ...
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीत ठिणगी! संजय राऊतांचे अमोल कोल्हेंना थेट आव्हान; ‘शिरूर आणि माढ्यात आम्ही लढणार, कसे जिंकता ते बघतो!’
डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी का...
Continue reading
डिसेंबरमध्ये बँकांना १९ दिवस सुट्ट्या? महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद राहणार; पाहा संपूर्ण यादी
December Bank Holiday 2026 : २०२६ वर्षाचा शेवटचा महिना असलेल्या डिसेंबरमध्ये बँक ग...
Continue reading
डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर शरद पवारांची भाजपला साथ? राज ठाकरेंची खोचक टिप्पणी; म्हणाले, ‘हे पवारांचं जंतरमंतर!’
देशाच्या राजकारणात सध्या डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेच्या मु...
Continue reading
पारद येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण; शेतकरी आणि ग्रामस्थांना मिळणार दर्जेदार वीजपुरवठा
६० किलोमीटर लांबीच्या वीज वाहिनीची समस्या सुटणार; ५ एमव्हीए क्षमतेच्या उपकेंद्र...
Continue reading
रोहित पवारांच्या सूचक ट्विटने राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाची चर्चा पुन्हा ऐरणीवर; ‘नात्यापेक्षा विचार महत्त्वाचा’ म्हणत नेमका कुणाला दिला इशारा?
डीलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी...
Continue reading
डिलिमिटेशन बिलावरून राजकीय वाद चिघळला; सुप्रिया सुळे यांची पहिली पोस्ट चर्चेत, अजित पवारांच्या आठवणींना उजाळा!
डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून महाराष्ट्रातील राजक...
Continue reading
आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! JP Morgan च्या अहवालात 3.4 लाखांच्या थकबाकीचा अंदाज; दरमहा 15,400 रुपयांची वाढ होण्याची शक्यता
8th Pay Commission Update : देशाती...
Continue reading
याशिवाय माँ चंडिका आपत्कालीन पथक, वंदे मातरम् आपत्कालीन पथक आणि वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
महात्मा फुले हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर संपूर्ण समाजाचे प्रेरणास्थान आहेत, हा विचार या सामूहिक अभिवादनातून अधोरेखित झाला. विविध समाजांतील नागरिकांनी एकत्र येऊन केलेले अभिवादन सामाजिक सलोखा, बंधुभाव, समता आणि एकात्मतेचे प्रतीक ठरले. महात्मा फुले यांच्या समतावादी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
Read Also : https://ajinkyabharat.com/mahatma-phule/