विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत
प्रमुख लढत होणार आहे. परंतु राज ठाकरे यांचा मनसे पक्षही
महत्वाचा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी
Related News
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
महायुतीला पाठिंबा दिला होता. परंतु विधानसभा निवडणूक स्वबळावर
लढण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला. त्यांनी मनसेच्या काही
उमेदवारांची घोषणासुद्धा केली आहे. तसेच राज ठाकरे यांचे पुत्र अमित
ठाकरे या निवडणूक रिंगणात उमेदवार म्हणून उतरणार असल्याची
शक्यता आहे. यामुळे महायुतीकडून राज ठाकरे यांचे मन वळण्याचा
प्रयत्न सुरु आहे. त्याचवेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ राज
ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. आता या भेटीत
काय ठरणार? त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का?
हा प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि
मुरलीधर मोहळ यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसेचे पुण्यातील
10 नेते ही शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. त्यात मनसेचे दोन शहरप्रमुख,
6 राज्य सरचिटणीस, 2 प्रवक्ते यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील 13
आणि शहरातील 8 अशा 21 विधानसभा मतदारसंघाचा राज ठाकरे
आढावा घेणार असल्याचे माहिती आहे. मुरलीधर मोहळ यांच्या राज ठाकरे
यांच्याशी होणाऱ्या भेटीनंतर पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची
शक्यता आहे. पुणे शहर किंवा जिल्ह्यातील काही जागांवर राज ठाकरे महायुतीला
पाठिंबा देतात का? भाजप मनसेला काही जागा देणार का? या सर्व गोष्टींवर
या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुरलीधर
मोहळ आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे परिणाम आता विधानसभा निवडणुकीत
उमटणार आहे. राज ठाकरे यांचे लक्ष्य महाविकास आघाडी आणि उबाठा
शिवसेना आहे. त्यामुळे त्यांना फायदा होईल, असे पाऊल उचलले जाऊ नये,
अशी भूमिका मुरलीधर मोहळ मांडण्याची शक्यता आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/important-meeting-of-manoj-jarange-today/