विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमकीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी
अजून एकदा अशा प्रकारची धमकी येऊन धडकली. 10
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
वेगवेगळ्या फ्लाईट्समध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात
आली. इंडिगो आणि अकासा एअरलाईन्सच्या प्रत्येकी पाच
विमानांसाठी हा धमकीचा कॉल आला होता. त्यानंतर सुरक्षा
यंत्रणा अलर्ट झाल्या. यंत्रणांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
मुंबईतून इस्तांबूलकडे रवाना होत असलेल्या फ्लाईट 6E 17
मध्ये बॉम्ब असल्याची धमकी आली. प्रवाशांची सुरक्षा आणि
चालक दलाची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. सुरक्षा
यंत्रणेसोबत काम करत आहोत आणि सावधगिरीने पावलं टाकत
असल्याची माहिती इंडिगोने दिली आहे. या सोमवारपासून
आतापर्यंत भारतीय विमान कंपन्यांना जवळपास 70 वेळा बॉम्बने
उडवण्याची धमकी आलेली आहे. या सर्व धमक्या अखेर फोल
ठरल्या आहेत. या धमक्यामुळे सुरक्षेसाठी मार्ग बदलण्यात आला.
अथवा त्यांच्या उड्डाण वेळेत बदल करण्यात आला आहे. नागरी
विमान वाहतूक मंत्रालयाने या धमक्याविषयी मोठा निर्णय
घेण्यासाठी पावलं टाकली आहे. अशा धमकी देणाऱ्या नागरिकांना
भविष्यात विमानाने प्रवास करता येणार नाही यासाठी एक खास
सूची तयार करण्यात येत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
त्यांना नो-फ्लाई सूचीत, यादीत टाकण्याची भूमिका त्यांनी घेतली.
त्यात असा त्रास देणाऱ्या प्रवाशांचा आणि नागरिकांचा समावेश
करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना आयुष्यात विमानाने प्रवास
करता येणार नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/india-dominates-manufacturing-sector-in-textile-industry/