शिवसेनेच्या बड्या नेत्याला निवडणूक आयोगाची नोटीस
आचारसंहितेचा पहिला फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला
आहे. वादग्रस्त वक्तव्या प्रकरणात निवडणूक आयोगाकडून
Related News
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांना नोटीस पाठवण्यात
आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची
शक्यता आहे. आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ
होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कळमनुरीमध्ये आयोजित एका
कार्यक्रमांमध्ये आमदार बांगर यांनी मतदारांना आणण्यासाठी पैसे
फोन पे ने पाठवा असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे
आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
आमदार बांगर यांनी मतदारांना पैशाचं प्रलोभन दिल्याने निवडणूक
आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे
इच्छुक उमेदवार अजित मगर यांनी केली आहे.
त्यामुळे आता निवडणुक आयोगाच्या वतीने आमदार संतोष बांगर
यांना आपल्या वक्तव्याचा खुलासा सादर करण्याची नोटीस
बजावण्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुढील
24 तासांमध्ये आमदार बांगर यांनी खुलासा सादर करावा, असं
त्या नोटीसमध्ये म्हटलं आहे. सदरील व्हिडिओ निवडणुक
विभागाच्या वतीने तपासल्या जात असून याप्रकरणी लवकरच
कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांच्या
वतीने मिळाली आहे. ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार अजित मगर
यांनी आमदार बांगर यांच्यावर निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग
केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे
आता बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/threat-to-plant-bombs-in-10-indigo-and-akashchaya-planes/