15 निष्ठावंतांना आदित्य ठाकरेंचा शब्द
शिवसेना ठाकरे गटाच्या विद्यमान आमदारांची मुंबईत आज
मातोश्री निवासस्थानी बैठक पार पडली. माजी मंत्री आणि ठाकरे
Related News
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यामान
आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत आदित्य
ठाकरेंनी विद्यामान आमदारांना निवडणुकीच्या प्रचारासाठी
कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी
करण्यात आली. काही दिवसांआधीच त्यांना रुग्णालयातून
डिस्चार्ज देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे विश्रांती घेत असल्यामुळे
आदित्य ठाकरेंनी आज ठाकरे गटाच्या विद्यामान आमदारांना
मार्गदर्शन केले. तसेच विद्यामान आमदारांना पक्षाकडून उमेदवारीचा
शब्द देखील देण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये
लवकरच विद्यामान आमदारांना एबी फॉर्म दिले जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदित्य ठाकरे यांच्या
उपस्थितीत ठाकरेंच्या सर्व विद्यमान आमदारांची बैठक पार पडली.
उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज जरी मिळाला असला तरी
विश्रांती घेत असल्याने आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या इतर
नेत्यांसोबत विद्यमान आमदारांची बैठक पार पडली. शिवसेनेच्या
विद्यमान आमदारांना कामाला लागण्याच्या सुचना यामध्ये देण्यात
आले. बहुतांश विद्यमान आमदारांना उमेदवारीची खात्री देण्यात
आली आहे. यादी जाहीर होण्याची वाट बघू नका, तुमच्याबाबतीत
ती सर्व औपचारिकता आहे, असं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
विद्यमान आमदारांसोबत इतरही काही जणांना मातोश्रीवर आज
बैठकीला बोलावलं होतं. त्याचप्रमाणे जे उमेदवारीसाठी इच्छुक
होते, त्यांचीदेखील उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/justice-sanjeev-khanna-the-ninth-chief-justice/