कल्याण रेल्वे यार्डात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मोबाईल हिसकावून पोलीस स्टेशनचा बहाणा, आरोपी अटकेत
कल्याण रेल्वे यार्ड परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईल हिसकावून “पोलीस स्टेशनला चल” असा बहाणा करत आरोपीने मुलीला फसवून निर्जन रेल्वे यार्डात नेऊन अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सौरभ सोनवणे याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी अहिल्यानगर येथून मामाला भेटण्यासाठी कल्याण येथे आली होती. ती खोपोलीला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात थांबली असताना आरोपीने तिच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला त्याने तिचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि मोबाईल परत देण्यासाठी “माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल” असे सांगून तिला फसवले.
अल्पवयीन असल्याने आणि भीतीपोटी मुलगी आरोपीसोबत गेली. मात्र आरोपीने तिला पोलीस स्टेशनऐवजी कल्याण रेल्वे यार्डात नेले आणि तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. घटना घडल्यानंतर आरोपीने तिला तिथेच सोडून पळ काढला.
Related News
भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा? भारतीय कंपन्यांवर निर्बंधाची मागणी; H-1B व्हिसावरही टांगती तलवार
अमेरिका-भारत संबंधांमध्ये पुन्हा तणावाची चिन्हे; भारतीय कंपन्यांवर कारवाईची मागण...
Continue reading
“तुमच्याने होत नसेल तर, माझ्या पैशांनी बोर्ड लावते”; Vandana Gupte संतापल्या, नवी मुंबई विमानतळाचा व्हिडीओ चर्चेत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील दिशादर्श...
Continue reading
मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी आणि फोटोग्राफरचे विमान झ्युरिकला डायव्हर्ट; तांत्रिक बिघाडामुळे सहा अधिकारी अडकले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवसीय लं...
Continue reading
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
मुंबई : राज्यभरात आ...
Continue reading
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा
‘येत्या काही दिवसांत सर्व कळेल, कोणीच शिल्लक राहणार नाही’; ठाकरे गटातील संभाव्य फोडाफोडीवरून राजकीय वाताव...
Continue reading
कृष्ण बनून सजला, पण गळ्यातील माळच ठरली जीवघेणी; एकुलत्या एक आर्यनचा दुर्दैवी मृत्यू
जन्माष्टमीचा आनंद शोकात बदलला; माळेतील मणी गिळल्याने सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मुलांना सजव...
Continue reading
मुलाच्या तोंडात चॉकलेट असतानाच कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी घेतला धक्कादायक निर्णय; नळदुर्ग किल्ला प्रकरणात नवे खुलासे
नळदुर्ग : राष्ट्रीय दर्जाची कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्य...
Continue reading
महाराष्ट्र पुन्हा हादरला! खासगी शाळेच्या बस चालकाकडून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
नवी मुंबईतील धक्कादायक घटना; आरोपी बस चालकाला अटक, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
नवी मुंबई आणि पन...
Continue reading
अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव रोडवरील बिलाखेड गावाजवळ चार महिलांना कारने धडक...
Continue reading
मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; महाराष्ट्रातून मंत्र्यांची संख्या कमी होणार का? कोण IN, कोण OUT?
मागील अनेक दिवसांपासून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ...
Continue reading
भारत-चीनला नेपाळचा मोठा झटका! मदत नको, थेट नुकसानभरपाई द्या; UN मध्ये मांडणार मुद्दा
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर परिस्थिती अद्यापही गंभीर आहे. पुरामुळे मोठ्या प्रम...
Continue reading
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू; सेवेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना मिळणार नोकरी
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राज्य ...
Continue reading
घाबरलेल्या अवस्थेत पीडित मुलगी थेट कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचली आणि संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कल्याण जीआरपी आणि क्राईम ब्रँचने संयुक्त तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवण्यात आली आणि काही तासांतच त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
या घटनेमुळे कल्याण रेल्वे परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेल्वे यार्डसारख्या निर्जन भागात अशा घटना घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून अधिक कडक सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/shocking-5-facts-about-abu-dhabi-barakah-nuclear-energy-plants-drone-attack-only-after-the-fire/