बळेगाव येथे नव्याने सुरू असलेल्या घराच्या बांधकामावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लिंबू, कुंकू, हळद, टाचण्या तसेच काळ्या अगरबत्त्या ठेवण्यात आल्याचे आढळून आले. सकाळच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घरमालक आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता संशयास्पद वस्तू पाहून अनेकांनी भीती व्यक्त केली. गावात या घटनेबाबत विविध चर्चांना उधाण आले असून, काही नागरिकांनी यामागे अंधश्रद्धा आणि जादूटोण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर काहींनी हा केवळ भीती निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे मत मांडले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी परिसरात मोठी गर्दी केली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. गावात अशा प्रकारच्या घटना यापूर्वी कधी घडल्या नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
Related News
पुसदमध्ये महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला 4 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; एसीबीची धडक कारवाई
तुकाराम मुंढेंचा दणका! Domino’s नंतर Parle Agro गोदामावर 11 तास धाड; लाखोंचा माल जप्त
मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘वाघीण’ IPS रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कहाणी ; 20 वर्षांत 40 बदल्या!
नाशिकची सिटी लिंक बससेवा विस्कळीत; तब्बल 200 फेऱ्या रद्द, वाहतूक कोंडीचा मोठा फटका
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला;1 आरोपी ताब्यात, प्रकृती स्थिर
शिवसेना फुटीच्या खटल्याला मोठे वळण! कपिल सिब्बलांचा शिंदेंना महाप्रश्न; ‘कुठल्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली?’
मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर; पतीनंतर पत्नीनेही उचललं टोकाचं पाऊल
उद्योगमंत्री उदय सामंत 16 ऑगस्टला घेणार महत्त्वाची बैठक ; चाकणच्या उद्योजकांसाठी मोठी बातमी!
रायगडच्या पालकमंत्रीपदावर भरत गोगावले चा दावा; म्हणाले- “100% अडचण नाही”
अकोला पासपोर्ट कार्यालयाचा ‘महत्त्वपूर्ण विस्तार’ होणार? खासदार अनुप धोत्रे यांची एस. जयशंकरांकडे ठोस मागणी; 1लाख नागरिकांना मोठा दिलासा
‘तो तर धूर्त कोल्हा…’ कंगना रणौतने नसीरुद्दीन शाह यांना सुनावले; सोशल मीडियावर वाद पेटला
राहुल गांधींचा अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल “लेक्चर नको, आधी राजीनामा द्या!”; जंतरमंतर गोळीबारावर थेट सवाल
दरम्यान, संबंधित प्रकाराबाबत चौकशी सुरू असून, नेमका हा प्रकार कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडे अद्याप अधिकृत तक्रार दाखल झाली नसली तरी नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन स्थानिक स्तरावर करण्यात येत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/a-sudden-thrilling-murder-with-sharp-weapons/
