महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर
महायुती सरकारने आज पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री
आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने घेतलेल्या
Related News
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधींची स्मृती शिंदेंना खास भेट; 3 कारणांनी VIDEO VIRAL
Revati Sule Reception : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्र...
Continue reading
TET पेपरफुटीचा धक्कादायक खुलासा; 16वा आरोपी प्रकाश पवार अटकेत, सोलापूर कनेक्शन उघड
TET Exam Scam Solapur : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी...
Continue reading
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत...
Continue reading
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
वेगवेगळ्या निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या पत्रकार
परिषदेला उपस्थित होते. “शरद पवारांना आव्हान करतो की,
त्यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगावा”,
असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुतीचा जागावाटापचा फॉर्म्युला
काय असणार? त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘लवकरच
सांगू’. “वेगवेगळ्या घटकांनाही दिलासा दिला आहे. कोतवाल,
अंगणवाडी सेविका, आशाताई वर्कर प्रत्येक घटकाला आपण
दिलासा दिला. होमगार्डचं मानधन दुप्पट केलं. त्यांच्याही जीवनात
परिवर्तन केलं. आगरी, कोळी, गवळी समाज, शिंपी, सोनार,
लोहार, आर्यवैश्य, तेली समाज असेल प्रत्येकाचे आपण महामंडळ
तयार केलं आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला.
अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक
लाख तरुणांना उद्योगपती केलं आहे” असं देवेंद्र फडणवीस
म्हणाले. “वृत्तपत्र विक्रेत्यांनाही आपण पहिल्यांदाच दिलासा दिला
आहे. आपण पायाभूत सुविधांचं काम केलं आहे. समृद्धी महामार्ग,
ग्रामीण महामार्ग, नवीन महामार्ग आदी कामे केली आहे. पायाभूत
सुविधेच्या क्षेत्रात केलेलं काम अभूतपूर्व आहे. वाढवण बंदर हे
महाराष्ट्राला 25 ते 30 वर्ष राज्याची आणि देशाची अर्थव्यवस्था हे
बंदर चालवेल. जेएनपीटीपेक्षा तीन पट मोठं बंदर आहे. जगातील
10 बंदरांपैकी एक आहे. यातील सर्व अडचणी आपल्या सरकारने
दूर केल्या आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“विरोधी पक्ष लाडकी बहिणीवर टीका करतो. मुलींना मोफत
शिक्षण देणार कुठलं सांगत आहे. सरकारकडे पैसे नाही. पण
त्यांचे नेते म्हणतात, आमचं सरकार आलं की आम्ही 2 हजार रुपये
देऊ. मग विरोधकांनी ठरवलं पाहिजे सरकारकडे आहे की नाही.
आम्ही काही योजना सांगितल्या आहेत. आणखी योजना
जाहीरनाम्यात देणार आहोत. विरोधक कन्फ्यूज आहेत.
सरकारकडे पैसे नाही म्हणतात आणि नवनवीन योजना विरोधक
सुरू करत आहेत” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आणखी योजना जाहीरनाम्यात देणार आहोत असं देवेंद्र फडणवीस
म्हणालेत. म्हणजे आणखी काही समाजकल्याणकारी योजनांची
घोषणा महायुतीकडून होऊ शकते.
Read also: https://ajinkyabharat.com/aggressors-will-clean-up-the-bjp-in-the-elections/