आलेगाव येथील विवाहित युवक बेपत्ता

 विवरा : आलेगाव येथील रहिवासी सुनील तुळशीराम श्रीनाथ हे जय भवानी गणेश उत्सव मंडळाचे भाविक भक्त आहेत.
दररोज ते देवीची पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी मंडळात उपस्थित राहत होते.
मात्र, 5 ऑक्टोबर 2024 रोजी 10.30 वाजता घरून निघून गेले मात्र परत आले नाहीत.
 6 ऑक्टोबर 2024 रोजी बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाने चान्नी पोलिसांना दिली आहे.
त्यांचे चुलत भाऊचा सहदेव श्रीनाथ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्यां शोध घेण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले असून, संबंधित स्थानिकांना देखील या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.
नागरिकांना बेपत्ता व्यक्तीच्या संदर्भात माहिती असल्यास पोलिस स्टेशनला कळवावी असे आवाहन चान्नी  पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे
यांनी केले आहे.

Related News