काँग्रेस विरोधात अकोल्यात पुन्हा पोस्टरबाजी, राजकारण चांगलंच तापलं

अकोला शहरात निवडणुकीपूर्वी पोस्टरबाजीला ऊत
अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राजकारण चांगलंच तापलं आहे.
काँग्रेस विरोधात अकोल्यात पुन्हा पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
यापूर्वीही काँग्रेस विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली होती.
आता पुन्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावाखाली ही पोस्टरबाजी करण्यात आल्याचे दिसत आहे.
या पोस्टरबाजीतून काही सवाल विचारण्यात आले आहेत. यामध्ये ‘काँग्रेस संविधान वाचविणार कसे?
काँग्रेसका हाथ  भाजप के कमल के साथ’ असं लिहिण्यात आलं आहे. या पोस्टरबाजी मुळे शहरात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान यावर आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.

Related News