माजी नगरसेविका तथा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची कन्या
गीता गवळी शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती
मिळत आहे. दक्षिण मुंबईत अरुण गवळीला मानणारा मोठा वर्ग
Related News
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream : उन्हाळ्यातील गारवा देणारी झटपट आणि सोपी रेसिपी
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream , सोपी रेसिपी जाणून घ्या :...
Continue reading
10 मिनिटांत तयार होणारी हेल्दी स्प्राउट्स भेल: चाट खाण्याची इच्छा पूर्ण करणारा पौष्टिक पर्याय
10 मिनिटांत तयार करा हेल्दी Sprouts Bhel : आजच्या ध...
Continue reading
ITR Filing FY27: सुपर सीनियर सिटीझन्सना ITR भरायची गरज आहे का? नियम काय सांगतात जाणून घ्या सविस्तर
आर्थिक वर्ष 2025-26 (Assessme...
Continue reading
RBI ने Paytm Payments Bank परवाना रद्द केला: तुमच्या UPI सेवांवर काय परिणाम होणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडेच
Continue reading
भारतभरातील मिरची भजीचे 7 भन्नाट प्रकार: प्रत्येक प्रदेशाची वेगळी चव आणि खास परंपरा
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये स्ट्रीट फूडला एक खास स्थान आहे आणि त्यातही मिरची भजी (
Continue reading
बॉक्स ऑफिस रिपोर्ट: ‘भूत बंगला’ची स्थिर कमाई, तर ‘धुरंधर 2’ ने पार केला 1100 कोटींचा टप्पा
Bhooth Bangla vs Dhurandhar 2 : बॉलीवूडमध्ये सध्या दोन वेगवेगळ्या चित्रपटांच्या बॉक्स ऑ...
Continue reading
रकुल प्रीत सिंगचा ‘Situationship’ वादावर खुलासा; क्लिकबेट हेडलाईन्सवर साधला निशाणा
बॉलिवूड अभिनेत्री Rakul Preet Singh आणि निर्माता-अभिनेता ...
Continue reading
उन्हाळ्यातील खास आंब्याचे 6 थंडगार पेय: आम पन्नापासून मँगो मोजिटोपर्यंत
उन्हाळा आणि आंबा हे एकमेकांचे जणू खास मित्रच! तापमान वाढू लागले की शरीराला थंडावा देणाऱ्या आणि ताजेतवाने ठे...
Continue reading
‘स्प्लिट्सविला 16’ एपिसोड 47 OTT रिलीज: पैशा चॅलेंजचा थरार, नवीन पॅर चॅलेंज आणि डोम सेशनमध्ये मोठे ट्विस्ट
रिअॅलिटी शोच्या दुनियेत सध्या ‘Splitsvil...
Continue reading
आहे. त्यामुळे त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत
करण्यासाठी ठाकरे गटाची ही रणनीती असल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी
भाजपला पाठिंबा दिला होता. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांनी गीता गवळी यांना महापौर करण्याचं आश्वासन दिलं
होतं. यानंतर आता गीता गवळी या ठाकरे गटाच्या संपर्कात
असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे सचिव
तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळी यांची दगडी
चाळीत जाऊन भेट घेतली आहे. गीता गवळी भायखळा
विधानसभा मतदारंसघातून लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती
सूत्रांनी दिली आहे. पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा
निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.
मात्र त्यानंतर बदललेल्या गणितावरून गीता गवळी मशालीवर
निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. अरुण गवळी यांनी स्थापन
केलेला अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी या नगरसेविका
होत्या. त्याचप्रमाणे आरोग्य समितीच्या अध्यक्षा देखील गीता
गवळी होत्या. सध्या भायखळा विधानसभेत शिंदे गटाच्या आमदार
यामिनी जाधव आहेत. या ठिकाणी ठाकरे गटाकडून आणखी
पदाधिकारी देखील इच्छुक आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/adani-group-and-google-signed-a-banana-agreement/