महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोला येथील अशोक वाटिका परिसरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ‘अजिंक्य भारत’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. सकाळपासूनच भीम अनुयायांची मोठी गर्दी अशोक वाटिकेत पाहायला मिळाली. निळ्या झेंड्यांनी परिसर दुमदुमून गेला असून भीमगीतांच्या जयघोषात वातावरण भारावून गेले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन सभा, पुष्पांजली आणि विचारमंथन कार्यक्रम पार पडत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी शहरभरातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. थेट प्रक्षेपणामुळे हा सोहळा राज्यभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.
अकोल्यातील अशोक वाटिकेत भीमजयंतीचा जल्लोष; ‘अजिंक्य भारत’वरून थेट प्रक्षेपण

14
Apr