मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागात दाणादाण उडवली.
गेल्या तीन दिवसांपासून काही भागात कोसळधार सुरू आहे. या
परतीच्या पावसाने शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे
Related News
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
दिसून आले आहे. उभी पीकं आडवी झाली आहेत. तर काही
पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या आस्मानी
संकटामुळे शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला
आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
नांदेड जिल्ह्यात सततच्या पाऊसामुळे पपई पिकांवर रोगांचा
प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान होत आहे.
मुदखेड तालुक्यातील पपईच्या बागांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात सलग गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने पपई
पिकावर रोंगाचा प्रादुर्भाव झाल्याने पपईची उगवन क्षमता कमी
झाली. पपई पिकत नसल्याने पपई बागेचं प्रचंड नुकसान झालं
आहे. शेकडो एकरवरील पपईच्या बांगा संकटात आल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून विजेच्या कडकडाटासह आणि
वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. त्याचा फटका पपई पिकाला
बसला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील भातसा नगरमध्ये
काल रात्री मुसळधार पावसामुळे शेतीची मोठे नुकसान झाले आहे.
त्यामूळे हात तोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठे नुसकान झाले
आहे. गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार
हजेरी लावली. पारतीच्या पावसाचे जिल्ह्यात जोरदार हजेरी
लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या हलक्या स्वरूपाच्या
धान पिकांना यामुळे धोका निर्माण झाला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/tremendous-trailer-of-yek-number-released/