महाविकास आघाडीत जागावाटपांसाठी बैठकांचं सत्र पार पडत
आहे. या जागावाटपात कुणाला किती जागा मिळतात? हे पाहणं
औत्सुक्याचं असणार आहे. विशेष म्हणजे काही जागांवर संपूर्ण
Related News
राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना “सत्यशोधक” पुरस्काराने सन्मानित
पुणे – अमरावती वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार; बडनेरा स्थानकावर थांबा निश्चित
भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अफवांचा मारा….
बलुचिस्तानकडून पाकिस्तान व चीनला थेट इशारा;
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताची पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर कारवाई;
पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी तळांसह शाळेवर हल्ला
भारतीय क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ होत आहे!
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा अकोला दौरा; अकोट येथे विवाह समारंभास उपस्थिती
संशयास्पद माहितीवर विश्वास ठेवू नका;
सराफा दुकानात पुन्हा ‘बंटी-बबली-आजी’ टोळीचा हात;
अकोल्यातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात मोठा खुलासा; किरीट सोमय्यांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
राज्याचं लक्ष असणार आहे. त्यापैकी एक महत्त्वाची जागा म्हणजे
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांचा अणुशक्तीनगर
विधानसभा मतदारसंघ. अणुशक्तीनगरच्या जागा ही महायुतीत
कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाला सुटण्याची शक्यता आहे. या जागेवर अजित पवार नवाब
मलिक यांना पुन्हा संधी देतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार
आहे. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत नवाब
मलिक यांच्यावक नवी लॉन्ड्रिंग प्रकरणाचे आरोप असल्यामुळे
अजित पवार कदाचित त्यांच्या कन्येला विधानसभेचं तिकीट देऊ
शकतात, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतही
जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडी देखील नवाब मलिक यांच्याविरोधात
तितकाच तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. सूत्रांकडून
याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाकडून अणुशक्तीनगरच्या
जागेची मागणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत
आहे. समाजवादी पक्षाकडून फहद अहमद इच्छुक असल्याची
सूत्रांची माहिती आहे. फहद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे
पती आहेत. अहमद हे सध्या समाजवादी पक्षाच्या युवक
प्रदेशाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्यांच्याकडून अणुशक्तीनगरच्या
जागेची मागणी करण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/amit-shah-toured-maharashtra-for-two-days/