देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती,
असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. फडणवीसांनी
मनापासून प्रयत्न करेन असं सांगितलं होतं. फडणवीसांनी मुलीची
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
शपथ घेऊन आश्वासन दिलं होतं, असे देखील एकनाथ खडसे म्हणाले.
दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केल्यानं भाजप प्रवेशाचा
निर्णय घेतल्याचं देखील एकनाथ खडसेंनी “माझा कट्टा” कार्यक्रमात सांगितलंय.
एकनाथ खडसे म्हणाले, मला एक दिवशी देवेंद्र फडणवीसांनी बोलवले.
तुम्ही म्हणता ना पंकजाला न्याय झाला तसाच न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
त्यावेळी आम्ही दोघेच होते. देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, नाथाभाऊ तुमची
मी राज्यपालपदासाठी शिफारस करतो. त्यावर मी म्हणालो, देवेंद्रजी खरं सांगा,
तुम्ही मला अनेकदा सांगितलं की हे करणार, ते देणार ते काही झालं नाही
त्यामुळे माझा विश्वास बसत नाही. मी म्हटलो राज्यपाल केले तर आनंदाची
गोष्ट आहे, पण माझा विश्वास बसत नाही. ते म्हणाले, माझ्या एकुलत्या एक
मुलीची शपथ घेऊन सांगतो हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. पुढे काय
झालं मला माहीत नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिली होते.
साधारण ही गोष्ट 2019 सालातील आहे. मी प्रवेश घेतो असं कधी म्हणालो नव्हतो.
मला प्रवेश घ्या असे म्हणाले होते. त्यानंतर मी शरद पवार आणि जयंत पाटलांशी
चर्चा करुन गेलो होतो. 40 वर्षे भाजपचे काम केले.इतके वर्ष काम केले, पक्षासाठी
पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. इतकं सगळ करून भाजपमध्ये मला प्रवेश
द्या ही विनंती करणे माझ्यासाठी अतिशय अपमानास्पद आहे असे देखील
एकनाथ खडसे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/supriya-sule-became-sister-after-lok-sabha-election/