भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Vivo ने आपल्या Y सीरिजमध्ये दोन नवीन 5G स्मार्टफोन – Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G – लॉन्च केले आहेत. मोठी बॅटरी, आकर्षक डिझाईन आणि मजबूत फीचर्ससह हे स्मार्टफोन बजेट युजर्ससाठी खास बनवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी आणि IP65 रेटिंगसारखी आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
काय आहे खास?
या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6500mAh ची प्रचंड बॅटरी देण्यात आली आहे, जी या किंमत श्रेणीत मोठा प्लस पॉईंट ठरते. दीर्घकाळ वापरासाठी ही बॅटरी उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय, 120Hz रिफ्रेश रेटसह मोठा डिस्प्ले, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आणि मजबूत बिल्ड क्वालिटीमुळे हे फोन मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी योग्य ठरू शकतात.
किंमत आणि व्हेरिएंट्स
Vivo Y21 5G
- 4GB + 128GB – ₹18,999
- 6GB + 128GB – ₹20,999
- 8GB + 128GB – ₹22,999
👉 निवडक बँक ऑफर्सवर ₹1500 पर्यंत कॅशबॅक
Vivo Y11 5G
- 4GB + 64GB – ₹14,999
- 4GB + 128GB – ₹16,999
👉 ₹1000 पर्यंत कॅशबॅक ऑफर
हे स्मार्टफोन ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत.
Related News
कोणाशी आहे स्पर्धा?
नवीन Vivo स्मार्टफोन थेट मध्यम बजेट सेगमेंटमधील लोकप्रिय मॉडेल्सना टक्कर देत आहेत. विशेषतः
Motorola Edge 60 Fusion 5G, Motorola G67 Power 5G, Realme P4x 5G, POCO M7 Plus 5G आणि OPPO K14x 5G यांसारख्या स्मार्टफोनशी कडवी स्पर्धा दिसणार आहे.
फीचर्स एक नजरात
डिस्प्ले
दोन्ही फोनमध्ये 6.74-इंच HD+ LCD डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. 1200 nits ब्राइटनेस असल्यामुळे सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट दिसतो.
प्रोसेसर
या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 ऑक्टा-कोर चिपसेट दिला आहे, जो स्मूद परफॉर्मन्स आणि मल्टीटास्किंगसाठी मदत करतो.
कॅमेरा
- Vivo Y21 5G मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा
- Vivo Y11 5G मध्ये 13MP रिअर कॅमेरा
- दोन्हीमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा
फोटोग्राफीसाठी बेसिक पण उपयुक्त सेटअप देण्यात आला आहे.
बॅटरी
दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6500mAh बॅटरी आहे.
- Y21 5G – 44W फास्ट चार्जिंग
- Y11 5G – 15W चार्जिंग
बिल्ड आणि सुरक्षा
IP65 रेटिंगमुळे फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. SGS मिलिटरी ग्रेड शॉक रेसिस्टन्स देखील मिळते.
कनेक्टिव्हिटी
5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, USB Type-C पोर्टसह सर्व आवश्यक फीचर्स देण्यात आले आहेत.
कलर ऑप्शन्स
- Y21 5G – Champagne Gold, Midnight Blue
- Y11 5G – Sunrise Gold, Midnight Blue
जर तुम्ही 15,000 ते 23,000 रुपयांच्या बजेटमध्ये दमदार बॅटरी, 5G सपोर्ट आणि स्मूथ परफॉर्मन्स असलेला स्मार्टफोन शोधत असाल, तर Vivo Y21 5G आणि Vivo Y11 5G हे दोन पर्याय नक्कीच विचारात घेण्यासारखे आहेत. विशेषतः मोठी बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले ही या फोनची मुख्य ताकद आहे. मात्र, कॅमेरा सेगमेंटमध्ये अजून सुधारणा होऊ शकली असती.
read also : https://ajinkyabharat.com/ipl-2026-kkr-harshit-ranachya-jagi-navdeep-saini-kkrchi-mothi-announcement/
