वंचितांच्या आयुष्यात आनंदाची पहाट फुलवणारे डॉ. सुगत वाघमारे यांचा अकोल्यात भव्य सत्कार

सुगत वाघमारे

अकोला: समाजातील वंचित आणि तळागाळातील घटकांसाठी, विशेषतः अनाथ व गरजू बालकांसाठी मायेची ऊब देणारे कार्य करणाऱ्या तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुगत दादा वाघमारे यांचा महिला व बाल विकास विभाग, अकोला यांच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. दिनांक २२ मार्च २०२६ रोजी महिला व बाल विकास भवन येथे आयोजित एका भावूक आणि उत्साहपूर्ण सोहळ्यात डॉ. वाघमारे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

डॉ. सुगत वाघमारे आणि त्यांच्या तिक्ष्णगत टीमने नुकतेच अकोला जिल्ह्यातील शासकीय बालगृह, गायत्री बालिकाश्रम आणि सूर्योदय बालगृहातील बालकांसाठी २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान एका अभूतपूर्व मुंबई सहलीचे आयोजन केले होते. या सहलीत बालकांनी इमेजिका पार्क, राणीचा बाग, पंडित जवाहरलाल नेहरू संग्रहालय आणि गेट वे ऑफ इंडिया यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणांना भेटी दिल्या. केवळ पर्यटनच नव्हे, तर बालकांची राहण्याची व्यवस्था आलिशान हॉटेलमध्ये करून त्यांना एक सन्मानजनक अनुभव देण्यात आला. बोटिंगचा आनंद लुटताना या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर जो ओसंडून वाहणारा आनंद होता, तोच या उपक्रमाचे खरे यश ठरले. या सत्कार सोहळ्याप्रसंगी बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य ॲड. संजय सेंगर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून डॉ. वाघमारे यांच्या कार्याला सलाम केला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजश्री कोलखेडे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. अनिता गुरव, राजेश देशमुख, ॲड. शीला तोष्णीवाल आणि प्रांजली जैस्वाल यांसारख्या मान्यवरांनी डॉ. वाघमारे यांच्या कल्पकतेचे आणि नियोजनाचे तोंडभरून कौतुक केले.

याप्रसंगी तिक्ष्णगत संस्थेचे समन्वयक सचिन पाटील, विशाल शिंदे, बॉबी पळसपगार, उमेश शिरसाट आणि श्वेता शिरसाट यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले, तर सूत्रसंचालन चाईल्ड हेल्प लाईनच्या समन्वयक हर्षाली गजभिये यांनी प्रभावीपणे सांभाळले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Related News

या सोहळ्यात सहभागी झालेल्या बालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “अशी सहल दरवर्षी व्हावी,” अशी भावना व्यक्त केली. डॉ. सुगत वाघमारे यांच्यासारख्या समाजधुरिणांमुळे आज बालगृहातील बालकांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळत आहे, असे मत यावेळी सर्व मान्यवरांनी व्यक्त केले.

केवळ सहलच नाही, तर बाल हक्कांचा लढा!

तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रंगभरण स्पर्धा, आरोग्याप्रति जागृती निर्माण करण्यासाठी ‘वॉकेथॉन’ आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांतून ही संस्था बालकांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देत आहे. विशेष करून ‘बालकांचे अधिकार’ आणि ‘बालकांचे संरक्षण’ या विषयावर डॉ. वाघमारे यांनी केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/smita-sutwane-felicitated-on-behalf-of-st-kashtakari-jansanghchaya/

Related News