हरियाणातील गुरुग्राम शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 38 वर्षीय पित्याने आपल्या केवळ दोन वर्षांच्या निष्पाप मुलीला कडेवर घेत 23व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (16 मार्च) सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुग्राममधील सेक्टर 102 येथील जॉयविले सोसायटी मध्ये घडली. सकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास संबंधित व्यक्तीने आपल्या पत्नीला “मुलीला बागेत खेळायला घेऊन जातो” असे सांगितले. मात्र, तो थेट 23व्या मजल्यावरील टेरेसवर गेला आणि काही क्षणातच आपल्या मुलीसह खाली उडी घेतली.
ही घटना घडल्यानंतर सोसायटी परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बाप-लेकीला तत्काळ जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Related News
वेबसिरीज पाहून पत्नीच्या हत्येचा धक्कादायक कट; तलवार लपवून 12.75 लाख रुपये घेऊन पळण्याचा प्रयत्न, अखेर पती अटकेतनवी दिल्ली : दिल्लीतील गगन विहार परिसरात एका विवाहितेच्या हत्येप...
Continue reading
क्रूर हल्ला! 34 वार, 32 सेकंद आणि एका शिक्षिकेचा अंत; CCTV फुटेजने उघड केला थरार
महिला शिक्षिकेची निर्घृण हत्या : हरियाणातील फरिदाबादजवळील एका खासगी शाळेत घडलेल्या निर्घृण हत्याका...
Continue reading
दिल्लीतील NEET पेपरफुटी आंदोलनादरम्यान CJP संस्थापक अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. संसद परिसरात तणाव, लाठीमार, नड्डा-शहा बैठका आणि धर्मेंद्र प्रधानांच्या र...
Continue reading
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतन अग्रवालच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने संपूर्ण रा...
Continue reading
बंगळुरूमध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय तपन नाथ या तरुणाने मित्रांच्या कथित हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्यानंतर नैराश्यात येऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या इशाऱ्यानंतर ...
Continue reading
वाशिमच्या समृद्धी महामार्गावर पतीने पत्नीची लोखंडी रॉडने मारहाण करून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना. तीन लहान मुलांसमोर घडलेल्या या गुन्ह्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात ...
Continue reading
गुरुग्राममध्ये 25 वर्षीय AI इंजिनीअरने प्रेयसीची चाकूने हत्या केल्यानंतर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिस्ड कॉल्समुळे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
...
Continue reading
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील 5 धक्कादायक खुलासे : सिया-चेतनचे गुप्त लग्न, सिंदूर, चॅट्स आणि ब्राउझिंग हिस्ट्री
पुणे : राज्यभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज ...
Continue reading
मिरा-भाईंदरमध्ये ११ वर्षीय शाळकरी मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैद्यकीय तपासणीत ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले असून आरोपीविरोधा...
Continue reading
दिल्लीतील 28 वर्षीय आकृती सुतार हिचा लग्नानंतर अवघ्या अडीच महिन्यांत संशयास्पद मृत्यू झाला. ऑफिसमध्ये पार्टी करून घरी निघालेल्या आकृतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाने पती आणि सासरच्या मंड...
Continue reading
उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात उघडकीस आलेल्या एका हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. पत्नीने आपल्या पतीचा खून करून त्याचा मृतदेह घरातील बाथरूमच्या जमिनीखाली पुरल्याचा धक...
Continue reading
धक्कादायक! 23 वर्षीय शिक्षिका आणि 40 वर्षीय लॅब टेक्निशियनचा मृत्यू; प्रेमसंबंधांच्या प्रकरणात 7 मोठे खुलासे
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये 23 वर्षीय शिक्षिका आणि 40 वर्षीय विवाह...
Continue reading
कौटुंबिक पार्श्वभूमी काय?
मृत व्यक्ती मागील दोन वर्षांपासून आपल्या पत्नी आणि मुलीसह या सोसायटीत राहत होता. हे कुटुंब मूळचे दिल्लीतील नांगलोई परिसरातील असून, त्यांनी दिल्लीतील किरारी भागात पाचवीपर्यंतचे एक खासगी शाळा चालवली होती. कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिर असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
धक्कादायक कारण समोर
या आत्महत्येमागे गंभीर आरोग्य समस्या कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे. मृत व्यक्तीच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिड काळापासून त्याला विविध आरोग्याच्या समस्या भेडसावत होत्या. विशेषतः त्याच्या एका डोळ्याची दृष्टी पूर्णपणे गेली होती, तर दुसऱ्या डोळ्याची दृष्टीही हळूहळू कमी होत होती. या शारीरिक व्याधींमुळे तो गेल्या काही महिन्यांपासून तीव्र मानसिक तणाव आणि नैराश्यात होता.
मानसिक तणाव, आरोग्याच्या समस्या आणि भविष्यातील असुरक्षिततेच्या भीतीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्याने आपल्या निष्पाप मुलीलाही सोबत का घेतले, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पोलीस तपास सुरू
या घटनेनंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. उडी मारण्यापूर्वी नेमकं काय घडलं, कोणती परिस्थिती निर्माण झाली, तसेच कोणत्याही प्रकारचा सुसाइड नोट आढळला आहे का, याचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि सोसायटीतील नागरिकांच्या जबाबांच्या आधारे तपासाची दिशा ठरवली जात आहे.
समाजाला हादरवणारी घटना
ही घटना केवळ एक आत्महत्या नसून समाजातील वाढत्या मानसिक तणावाचे गंभीर चित्रही समोर आणते. आरोग्य समस्या आणि मानसिक नैराश्य यांचा व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर किती खोल परिणाम होऊ शकतो, याचे हे भीषण उदाहरण आहे.
read also : https://ajinkyabharat.com/malad-sugar-scam-shocking-revelation-860-kg-sugar-scam-exposed-big-bust-in-store-in-7-months/