पुण्यासह राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे.
गणरायासाठी गणेश मंडळ मोठमोठे मंडप उभारताना दिसत आहेत.
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
त्यावर पुणे महापालिकेने प्रकाश टाकत रस्त्यांच्या होणाऱ्या दुर्दशेवर
गणेश मंडळांचे लक्ष वेधले आहे. मंडप उभारताना रस्त्यांवर खड्डे केले
जातात. मात्र, गणेश विसर्जणानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे
छोटे खडे्डे जरी केले असले तरी त्यामुळे रस्त्ये जास्त प्रमाणात उखडले
जातात. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यावर
आता उपाययोजना म्हणून गणेश मंडपांसाठी खोदलेले खड्डे भरण्याची
जबाबदारी मंडळांची असेल असे महापालिका आयुक्तांनी म्हटले आहे.
या कामातून जर मंडळांनी हात वर केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार
असल्याचा कडक इशाराही त्यांनी मंडळांना दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात
अनेक खड्डे पडले असतानाच हा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे
रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, शहरातील विविध भागात अनेक जुने
खड्डे पडले असून नवीन खड्डे पडत आहेत. रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन
डॉ.भोसले यांनी खड्डे दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश रस्ते
विभागाला दिले आहेत. हवामानाची परवानगी मिळताच PMC खड्डे भरण्यासाठी
केंद्रीत मोहीम सुरू करेल, असे त्यांनी नमूद केले. गणेश चतुर्थीच्या अगोदर
ही मोहीम राबविण्यात येणार असून, असाच प्रयत्न अनंत चतुर्दशीच्या पाच
दिवस आधी केला जाणार आहे. पावसाळा संपला की रस्त्यांची पूर्ण दुरुस्ती
केली जाईल, असे आश्वासन डॉ.भोसले यांनी दिले.
Read also: https://ajinkyabharat.com/wherever-the-prime-minister-takes-his-hand-sanjay-raut-is-his-mother/