पुणे शहरातील कोथरूड परिसरात एक वेगळाच आणि चर्चेचा विषय ठरलेला प्रसंग समोर आला आहे. नवनिर्वाचित नगरसेवक सुनील पांडे यांनी पदभार स्वीकारून महिना उलटूनही आपल्या जनसंपर्क कार्यालयावर ‘नगरसेवक’ असा अधिकृत बोर्ड लावला नव्हता. ही बाब केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः पुढाकार घेत अनोख्या पद्धतीने हा प्रश्न सोडवला.
घडलेल्या प्रकारानुसार, मोहोळ हे कोथरूड परिसरात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असताना पांडे यांच्या कार्यालयात पोहोचले. कार्यालय पाहताना त्यांच्या लक्षात आले की, पांडे यांनी अजूनही आपल्या पदाचा कोणताही फलक लावलेला नाही. आजच्या राजकारणात पद मिळताच मोठमोठे बॅनर, पोस्टर आणि फलक लावण्याची स्पर्धा असताना पांडे यांचा साधेपणा वेगळाच ठरला.
मात्र, ही बाब पाहून मोहोळ यांनी केवळ सूचना देऊन थांबणे पसंत केले नाही. त्यांनी तात्काळ फलक तयार करून घेतला आणि स्वतः पांडे यांच्या कार्यालयात जाऊन तो स्वहस्ते लावला. यावेळी त्यांनी हसत-खेळत पांडे यांना हलकाफुलका टोला लगावला. “अरे, लोक नगरसेवक व्हायच्या आधीच बोर्ड तयार करून ठेवतात आणि तू नगरसेवक होऊन महिना झाला तरी अजून बोर्ड लावला नाहीस!” असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हास्याचे वातावरण निर्माण केले.
Related News
Rahul Gandhi : ‘मुलींना मारलं, अंगावर छर्रे लागले’; दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
Manoj Jarange Patil : ‘जंतर-मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार’; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना सुप्रीम कोर्टाचा झटका; थेट नोटीस, दोन आठवड्यांत उत्तर द्या!
मोठी बातमी! विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप; दिल्ली पोलिसांनी दिलं धक्कादायक स्पष्टीकरण
सर्वात मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदींसोबत भेट; विद्यार्थी आंदोलनावर झाली मोठी चर्चा?
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मोदी सरकार का घेत नाही? समोर आली ‘ही’ 5 मोठी कारणं!
Naseeruddin Shah : ‘अज्ञानी व्यक्ती देशाचं नेतृत्व करत असेल तर…’; नसीरुद्दीन शाह यांचा मोदींवर घणाघात
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी का बसले आंदोलनाला? स्वतःच सांगितलं कारण
या घटनेनंतर परिसरात मोहोळ यांच्या साधेपणाची आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, सुनील पांडे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “साहेबांनी स्वतः माझ्या कार्यालयात येऊन हक्काने बोर्ड लावणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.”
या प्रसंगामुळे राजकारणातील दिखाऊपणाला एक वेगळा संदेश मिळाल्याची चर्चा सुरू असून, साधेपणा आणि कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पुण्यातील या अनोख्या घटनेने नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले आहे.
