शहरातील जुनीवस्ती परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शहरात खळबळ उडाली आहे. वैभव डूडूल (वय अंदाजे २५) असे मृत तरुणाचे नाव असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मूर्तीजापूर शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वैभव हा आपल्या कुटुंबासह जुनीवस्ती भागात राहत होता. सोमवारी रात्री सुमारे १.३० वाजताच्या सुमारास त्याने राहत्या घरातच गळफास घेतल्याचे समोर आले. काही वेळानंतर ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच घरात एकच गोंधळ उडाला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला खाली उतरवून खासगी वाहनाने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच मूर्तीजापूर शहर पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून कुटुंबीय आणि नातेवाईकांची चौकशी सुरू आहे.
Related News
अंबरनाथ क्राइम न्यूज, अफेअर ब्रेकअपनंतर तरुणीची आत्महत्या, हॉटेलमधील धक्कादायक घटना
“रिश्ते मायने रखते हैं” : सुप्रिया सुळे यांचं बारामती पोटनिवडणुकीवर सूचक वक्तव्य
“गर्लफ्रेंड कोणाची?” नाशिकमध्ये प्रेमावरून दोन तरुणांमध्ये भररस्त्यात मारामारी, व्हिडिओ व्हायरल
मुंबई लोकलमध्ये फेरीवाल्यांना मान्यता, प्रवाशांचा संताप उसळला; महसुलासाठी सुरक्षिततेचा बळी
कुणाल कामरा विधान भवनात हजर, शिंदेंवरील विडंबन गीत प्रकरण पुन्हा चर्चेत मुंबई : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन Kunal Kamra आज मुंबईतील विधान भवनात सुनाव
अशोक खरात प्रकरणाला नवं वळण: जुन्या आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा तपास, अडचणी वाढण्याची शक्यता
कोल्हापूर हादरला! दारात खेळताना विजेचा धक्का ; अडीच वर्षांच्या अन्वीकचा मृत्यू , आईचा आक्रोश हृदय पिळवटणारा
कल्याणमध्ये लोकल सेवा विस्कळित; कसारा लोकल अर्धा तास ठप्प, प्रवाशांचा प्रचंड संताप
अजित पवारांचा अपघात की घातपात? शरद पवारांनी पहिल्यांदाच उघड केला ‘त्या’ दिवसाचा संपूर्ण घटनाक्रम
अजित पवारांच्या निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा बंद – शरद पवारांचा धक्कादायक दावा
दरम्यान, तरुण वयातच वैभवने जगाचा निरोप घेतल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात असून नेहमीप्रमाणे वावरणारा वैभव असे टोकाचे पाऊल उचलेल, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. आर्थिक अडचण, वैयक्तिक कारणे किंवा अन्य काही कारण या निर्णयामागे आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटनेचा पुढील तपास मूर्तीजापूर शहर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
