सुकळी (ता. पातूर) – पातूर तालुक्यातील सुकळी ते सायवनी हा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सायवनीमार्गे मुख्य मळसूर रस्त्याकडे जाणारा हा मार्ग विशेषतः श्री क्षेत्र सोपिनाथ महाराज संस्थान, मळसूर येथे यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यावश्यक मानला जातो. मात्र रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि उखडलेली डांबरीकरणाची पातळी यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे.
गेल्या सात ते आठ वर्षांपासून या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती किंवा डागडुजी करण्यात आलेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. परिणामी चार ते पाच किलोमीटरचा हा रस्ता पूर्णपणे विस्कळीत झाला असून वाहनचालकांना मोठा फेरा मारत सुकळी फाटा मार्गे जावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक निवेदने सादर केली होती. मात्र त्या निवेदनांवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. यात्रेचा कालावधी जवळ येत असताना रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Related News
शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार ५ हजार रुपये; दुष्काळग्रस्तांना तातडीचा दिलासा
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचा...
Continue reading
राहुल गांधी यांनी गर्भवती महिला पत्रकाराला धक्का दिला? भाजपचा गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?
SIR विरोधातील आंदोलनादरम्यान महिला पत्रकारासोबत गैरवर्तन झाल्याचा भाजपचा दावा; ऋचा पारा...
Continue reading
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : सरकारी कंपन्याही वाढवणार पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : Petrol आणि डिझेलच्या दरांक...
Continue reading
ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा; दिल्लीत INDIA आघाडीचा हल्लाबोल, निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा
INDIA Bloc Protest Against Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञाने...
Continue reading
शेतकऱ्यांना मदत लवकरच? ४४ टक्के पंचनामे पूर्ण; १०-१२ ऑक्टोबरपर्यंत १०० टक्के पंचनाम्यांचे कृषिमंत्र्यांचे लक्ष्य
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्...
Continue reading
SIR वरून विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचे सणसणीत उत्तर; अचूक मतदार यादीसाठी महत्त्वाचे 8 मुद्दे समोर
Devendra Fadnavis on SIR : महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR 2026...
Continue reading
फडणवीस मोदींचे वारसदार? उपपंतप्रधानपदाबाबत संघात चर्चा असल्याचा संजय राऊतांचा दावा; तीन महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
१० ते १२ महिलांच्या तक्रारींचा दावा; श्वेता महालेंचा सूचक इशारा, संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
भाजप आमदार श्वेता महाले आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद आता अधि...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
मोठी बातमी! शरद पवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्व...
Continue reading
No UPI Day Today 2 October : आज बाजारात जाताना खिशात कॅश ठेवा; व्यापाऱ्यांचा ‘नो UPI डे’, अतिरिक्त शुल्काच्या प्रस्तावाला विरोध
No UPI Day Today 2 October : देशभरातील व्यापारी सं...
Continue reading
स्थानिक नागरिकांच्या मते, हा रस्ता सुकळीवरून चान्नीला जाण्यासाठी सर्वात सोयीचा आहे. परंतु सध्या खड्डेमय परिस्थितीमुळे अपघाताचा धोका वाढला असून रात्रीच्या वेळी प्रवास करणे अधिकच कठीण झाले आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन सुकळी ते सायवनी रस्त्याचे काम पूर्णत्वास न्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रस्त्याच्या कामाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत असली तरी प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रस्ता रोकोचा इशारा
“रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा वाहनधारक सचिन जाधव (सुकळी) यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
read also: https://ajinkyabharat.com/chinese-robot-dog-controversy-ai-summit-madhuun-galgotias-university-la-bahercha-rasta-10-shocking-revelations/