तालुक्यात विविध शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये आघाडीवर असलेल्या पीएम श्री जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, वाडेगाव येथे दि. ११ व १२ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय भव्य मोफत दंतचिकित्सा शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आपल्या दातांची तपासणी करून घेतली. तपासणीनंतर काही विद्यार्थ्यांना आवश्यक ती औषधेही देण्यात आली.
वाडेगाव येथील ‘एकदंत मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक’च्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या वेळी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक समाधान सोर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. सायली आसोलकर यांनी नर्सरी ते इयत्ता आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची काळजीपूर्वक तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांना दातांची योग्य स्वच्छता कशी राखावी, नियमित ब्रश करण्याचे महत्त्व आणि दंतआरोग्याविषयी आवश्यक मार्गदर्शनही केले.
शाळेतील सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना तपासणीसाठी प्रोत्साहित करून शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद मिळवून दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये दंतआरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यात अशा आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
Related News
धाराशिवच्या वाशी तालुक्यातील पारा येथील PM श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयाबीन भातामध्ये अळ्या आढळल्याने खळबळ उड...
Continue reading
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,090 जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी तब्बल 20,931 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेश पंधरवडा, शिक्षकांच्...
Continue reading
राज्यातील खासगी शाळांच्या कँटीन, मध्यान्ह भोजन आणि पोषण आहाराची FDA कडून विशेष तपासणी सुरू. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या आरोग्यास...
Continue reading
MHT CET CAP 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! इंजिनिअरिंग आणि MBA प्रवेश नोंदणीला 16 जुलैपर्यंत मुदतवाढ; जाणून घ्या 5 मोठे अपडेट्स
मुंबई: महारा...
Continue reading
NEET UG 2026 फेरपरीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर कठीण असल्याचे सांगितले. पुण्यातील 37 केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडली. तज्ज्ञ...
Continue reading
रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र उष्णतेमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वेळेत मोठा बदल. २२ जून २०२६ पासून सकाळी ७ ते ११.३० या वेळेत शाळा भरतील. जाणून घ्या न...
Continue reading
१६ लाख विद्यार्थ्यांच्या गणवेशांची धडक तपासणी! हलके कापड वापरणाऱ्या कंत्राटदारांवर थेट फौजदारी कारवाई; जाणून घ्या सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट...
Continue reading
मुंबई : बारावीच्या परीक्षा, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हजारो शिक्षकांना आता स्वतःच्या मानधनासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर आल...
Continue reading
AI चा कडक पहारा! YCMOU च्या 558 परीक्षा केंद्रांवर थेट नजर, कॉपी करणाऱ्यांची आता खैर नाहीनाशिक : तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रातही आधुनिक साधन...
Continue reading
कल्याण : कल्याण पूर्वेतील कमलादेवी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक व मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या आरोपांवरून वातावरण चांगलेच तापले आ...
Continue reading
वाडेगाव: केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध वाडेगाव बस स्थानक परिसरात बुधवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी सकाळी सुमारे ११ वाजता शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्य...
Continue reading
अकोट (दि. ११ फेब्रुवारी २०२६): स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथील अर्थशास्त्र विभागाच...
Continue reading
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा भाग्यश्री हिराळकर तसेच समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालक व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होत असून, शाळेच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/7-powerful-valentine-day-2026-instagram-new-features-romantic-update-gave-tremendous-pleasure-using/