शेतकर्यांसाठी मोठा दिलासा: RBI बदलणार Kisan Credit Card नियम, मिळणार जास्त कर्ज
देशातील शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेत मोठा बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. या बदलांमुळे शेतकर्यांना अधिक कर्ज मिळण्याची शक्यता वाढणार असून, परतफेडीचा कालावधीही वाढवला जाऊ शकतो.
RBI च्या नव्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार बँकांना KCC कर्जाची मंजुरी, वितरण आणि वापर याबाबत अधिक स्पष्ट सूचना दिल्या जातील. त्यामुळे शेतकरी त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेले कर्ज सहज आणि जलद मिळवू शकतील.
सर्वात महत्त्वाची सुधारणा म्हणजे KCC कर्जाचा कालावधी आता सहा वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. याचा फायदा असा होणार आहे की शेतकरी त्यांचे कर्ज हंगामानुसार, शेतीच्या उत्पन्नानुसार परतफेड करू शकतील. दीर्घकालीन परतफेडीमुळे शेतीशी संबंधित आर्थिक योजना आखणेही सोपे होईल.
Related News
सिंधुदुर्गात 900 कोटींच्या जमीन व्यवहाराचा आरोप; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, मंत्र्यांच्या भूमिकेवरही सवाल
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमीन व्यवहारावरून महाराष्ट्राच्या रा...
Continue reading
राज्यात दुष्काळ जाहीर; 265 तालुक्यांचा समावेश, पंकजा मुंडे बांधावर पोहोचल्या; म्हणाल्या, ‘बळीराजाला बळी जाऊ देणार नाही’
राज्यात यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने अनेक भागांमध...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न द्या; संजय राऊतांचा भाजपवर खोचक टोला
पश्चिम बंगाल निवडणुका आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या पद्मभूषण मागणीवर राऊतांचा उप...
Continue reading
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून मोठ्या उपाययोजना
राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार...
Continue reading
बँकांना सलग पाच दिवस सुट्टी; सॅलरी कधी जमा होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Bank Holiday : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बँक कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित तीन दिवसांच्या संपामुळे बँक...
Continue reading
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; वाशिममध्ये नेमकं काय म्हणाले?
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...
Continue reading
सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता; केंद्र सरकारकडून आयात शुल्कात मोठी कपात
कच्च्या सोयाबीन आणि पामतेलावरील शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्के; कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांचा ‘खापर पणजोबा’ कुठून आला? फॉर्म-६च्या वादावर संजय राऊत आक्रमक; महाभियोग आणण्याची घोषणा निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेद आणि मतदार यादीच्या व...
Continue reading
Rohit Pawar चा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; ‘भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बॉम्बही पिकवायला लागला का?’
दुष्काळी पाहणी दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवरून Rohit Pawarची टीका; शेतकऱ्यांना ...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तीन दिवसांत दुष्काळाची अधिसूचना; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली ...
Continue reading
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नबाबत मोठे संकेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल ...
Continue reading
रस्त्याच्या कडेला दिसणारी ‘तोदरी’ नेमकी काय? आयुर्वेदात बिया, पाने आणि फुलांचा पारंपरिक वापर; जाणून घ्या उपयोग
रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत उगवणाऱ्या अन...
Continue reading
कर्जाच्या मर्यादेबाबतही बदल अपेक्षित आहेत. RBI शेतकऱ्यांच्या Scale of Finance प्रमाणे कर्ज मर्यादा निश्चित करण्याचा विचार करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या खर्चानुसार योग्य आणि पर्याप्त क्रेडिट मिळेल, आणि एक ठराविक रक्कमपुरतीच मर्यादित राहणार नाही.
त्याचबरोबर, शेतकर्यांना KCC अंतर्गत कृषी आवजारं, आधुनिक आणि स्मार्ट उपकरणं, तसेच इतर औद्योगिक उपकरणं खरेदी करण्याची परवानगी दिली जाणार आहे. हे बदल शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा ठरणार आहेत.
KCC अंतर्गत नियम आता अधिक सुसंगत, स्पष्ट आणि पारदर्शक होतील, ज्यामुळे कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होईल. या सुधारित नियमांची अंमलबजावणी कधीपासून होणार याची अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही, पण लवकरच RBI कडून अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.
शेतकरी वर्गासाठी हे बदल आर्थिक दृष्ट्या मोठा आधार ठरणार आहेत आणि शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे नेण्यास साहाय्यक ठरतील.
Read Also : https://ajinkyabharat.com/gold-price-update-1-gram-sonyachi-angathi-profitable-ki-totyachi/