अकोट : शासकीय सार्वजनिक वाचनालय अकोट यांच्या वतीने आयोजित जिल्हा वार्षिक ग्रंथोत्सवानिमित्त ग्रंथ साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडी पूजनाने झाली. सिंधी कॅम्प येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, जवाहर रोड, गवळीपुरा मार्गे सांस्कृतिक भवनापर्यंत वाजतगाजत ग्रंथदिंडी काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि पुस्तकांविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या ग्रंथदिंडीत अकोट शहरातील शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुंडा येथील वारकरी संप्रदाय मंडळानेही राजू भरणे यांच्या नेतृत्वाखाली वाद्यांच्या तालावर दिंडीची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे आणि वारकऱ्यांच्या पारंपरिक सहभागामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक रंग चढला.
यानंतर अकोट येथील सांस्कृतिक कला भवनामध्ये ग्रंथोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील तसेच तालुका व ग्रामीण भागातील विविध ग्रंथालयांचे आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अकोट नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. मायाताई धुळे, प्रशासन अधिकारी, मुख्याधिकारी, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शशिधरराव खोटरे, सुरेश दादा खोटरे, अकोला जिल्हा ग्रंथालयाचे जिल्हाधिकारी राजेश वानखडे, ग्रंथोत्सवाचे संयोजक पत्रकार राजेश डांगटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
Related News
अकोट : चंडिकापूरमध्ये नाली व पेव्हर ब्लॉक कामात गैरव्यवहाराचा आरोप; चौकशीची मागणी
ऑपरेशन ‘प्रहार’ची अकोट ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, जुगार अड्ड्यावर धाड; सहा जण ताब्यात, १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त
रामापूरमध्ये घरकुल योजनेत अन्याय?, 40 वर्षांपासून राहणाऱ्या चामलाटे कुटुंबाला अजूनही घर नाही
भाजप-एमआयएम युतीनंतर आमदारांवरील कारवाई फक्त चर्चेत !
‘वाळन’ कथासंग्रह अभ्यासक्रमात समाविष्ट
अकोट : रोटरी क्लबच्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात ८०४ रुग्णांची तपासणी
मूर्तिजापूरमध्ये अग्निशमन दलाच्या गाडीचे चाक चोरीला; तक्रार नाही, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात साजरा
अकोट येथील सांस्कृतिक कलाभवनात जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ संपन्न झाला
तसेच लेखिका प्रतिमाताई इंगोले, कविवर्य विठ्ठल कुलट, साहित्यप्रेमी, नगरसेवक, पुस्तक विक्रेते, विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी वाचन संस्कृती जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित करत ग्रंथालये ही ज्ञानाची खाण असून समाजाच्या बौद्धिक विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचनाची आवड वाढवणे, पुस्तकांशी नाते दृढ करणे आणि नव्या पिढीला साहित्याची ओळख करून देणे हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी नमूद केले. या कार्यक्रमामुळे अकोट शहरात ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा उत्सव अनुभवायला मिळाला.
