मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या बकरी चोरी प्रकरणात फरार असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली चारचाकी व दुचाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
माना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्र. ०१/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३ (२), ३१७ (२), ३ (५) बीएलएस अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी सतीश रघुनाथ पाथरे (वय ३४, रा. गुर्जवाडा, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ ते ७ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान गुर्जवाडा शेतशिवारातील गट क्रमांक ७५ येथून अज्ञात चोरट्यांनी बकऱ्यांची चोरी केली होती.
या प्रकरणात यापूर्वी एका आरोपीकडून चोरीस गेलेल्या बकऱ्या जप्त करण्यात आल्या होत्या, तर उर्वरित आरोपी फरार होते. पोलिसांनी तांत्रिक तपास व शोधमोहीम राबवून खालील आरोपींना अटक केली —
Related News
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; चंपत रायंसह तिघांना क्लिनचिट
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे 4 आरोपी अटकेत
8 महिन्यांची चिमुकली मध्यरात्री अंथरुणातून गायब; नाशिकमध्ये खळबळ
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने डोक्यात गोळी झाडून घेतली; उपचारादरम्यान मृत्यू
मुलाच्या तोंडात चॉकलेट… अश्विनी पौळ प्रकरणात धक्कादायक खुलासा!
अश्विनी पौळ प्रकरणात किल्ल्यातील रजिस्टरने उलगडले नवे धागेदोरे; ‘पती पाठीमागून येत आहेत’ म्हणत केला प्रवेश!
अखेर भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; चाळीसगावातील अपघातानंतर ग्रामस्थांचा संताप
CJP Protest : अभिजीत दिपके यांनी सोडलं जंतर-मंतर; तापाने फणफण, म्हणाले- ‘मला माफ करा, आरामाची गरज’
बंगळुरू तिहेरी हत्याकांडातील 7 धक्कादायक खुलासे; AI चॅटबॉटच्या मदतीने रचला खुनाचा थरारक कट
रवींद्र धंगेकरांसह 14 आरोपींचा शोध; स्वारगेट पोलिसांची विशेष पथके तैनात
मुंबई कोस्टल रोडवर भरधाव पोर्शेचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे चालकाचा जीव वाचला
4 आरोपी अटकेत! धक्कादायक छेडछाड प्रकरण; संभाजीनगरातील हनुमान टेकडीवर उच्चशिक्षित तरुणींना अश्लील टिप्पणी
रोहन रामराव ढोके (वय २१, रा. उमरी बाजार, ता. दर्यापूर, जि. अमरावती)
मोहन जीवन शिवरकर (वय ३२, रा. पार्डी, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती)
मयूर हिम्मतराव ढोके (वय २८, रा. उमरी ममदाबाद, ता. दर्यापूर)
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले एमएच २७ एच ९४२२ क्रमांकाचे चारचाकी वाहन (अंदाजे किंमत ₹६०,०००) तसेच एमएच २७ एचजी ८३७२ क्रमांकाची दुचाकी (अंदाजे किंमत ₹२५,०००) जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ठाणेदार गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल सुशील आठवले आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल जयश्री मेंढे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
माना पोलिसांच्या या प्रभावी कारवाईमुळे बकरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पुढील तपास माना पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
