Bigg Boss Marathi 6 : टास्कदरम्यान गंभीर आरोप, घरात प्रचंड राडा

Bigg Boss

Bigg Boss Marathi 6 : टास्कदरम्यान गंभीर आरोप, घरात प्रचंड गोंधळ; रुचिता–राकेश वादाने पेटलं बिग बॉसचं घर

‘Bigg Boss Marathi 6 ’चा कालच्या एपिसोड प्रेक्षकांसाठी प्रचंड धक्कादायक ठरला. पापडाच्या टास्कदरम्यान झालेल्या एका घटनेमुळे Bigg Boss Marathi 6 चं घर अक्षरशः रणांगणात बदललं. राकेशने रुचितावर गंभीर आरोप केल्यानंतर केवळ टास्कपुरता मर्यादित असलेला वाद वैयक्तिक आरोप, रडारड, आकांडतांडव आणि घर सोडण्याच्या धमक्यांपर्यंत पोहोचला.

पापडाच्या टास्कपासून वादाची ठिणगी

कालच्या Bigg Boss Marathi 6 एपिसोडमध्ये पापडाच्या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. रुचिता, प्रभूला इन्फ्लूएन्स करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इतर स्पर्धकांनी केला. याच दरम्यान रुचिता आणि राकेश यांच्यात जोरदार भांडण झालं. राकेशने थेट आरोप केला की, “रुचिता माझ्या अंगावर आली.” या वक्तव्यावर रुचिता चांगलीच संतापली.

रुचिताने राकेशला “एक नंबरचा नाटकी माणूस” असं संबोधत त्याचा आरोप फेटाळून लावला. दोघांमधील वाद इतका वाढला की राकेशने स्पष्ट शब्दांत सांगितलं, “मला हा गेम नाही खेळायचा. एकतर मी राहीन किंवा ही राहील घरामध्ये.”

Related News

करणसोबतही वाद, ‘वूमन कार्ड’चा आरोप

या सगळ्या गोंधळात रुचिता आणि करण यांच्यातही जोरदार शाब्दिक चकमक झाली. करणने रुचितावर ‘वूमन कार्ड’ खेळत असल्याचा आरोप केला. यावर रुचिता अधिकच चिडली आणि तिने आकांडतांडव केला. अनुश्रीने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत रुचिताला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तर विशालने राकेशला समजावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, Bigg Boss  ने सर्व स्पर्धकांना उभं राहायला सांगत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रभूने या वादात उगाचच ज्ञान पाझळल्याची टीका प्रेक्षकांमध्ये झाली. प्रभू म्हणाला, “रुचितानेच राडा करायला सुरुवात केली.”

राकेशचा संताप, घर सोडण्याची धमकी

रुचिताने पुन्हा पुन्हा राकेशचं नाव घेतल्यानंतर राकेश संतापाच्या भरात मधूनच उठून निघून गेला. तो म्हणाला, “मला नाही राहायचं या घरात. इथे कोणाचा आदर नाही. खेळ खेळतायत म्हणे.” राकेशच्या या प्रतिक्रियेमुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

Bigg Boss  ने दुसरी फेरी घ्यायची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र गेम पुढे नेण्यासाठी ‘टीम बी’मधील सदस्यांना ‘टीम ए’च्या कॅप्टनसीसाठी योग्य वाटणाऱ्या दोन सदस्यांची नावं सांगायला सांगितली.

कॅप्टनसीसाठी नावांची चर्चा

राकेशने “मला हे घर चांगलं ठेवायचं आहे,” असं म्हणत आपली भूमिका मांडली. ओमकारने विशालचं नाव सुचवलं, मात्र प्राजक्ता, दिव्या, प्रभू, राकेश आणि करण यांनी त्याच्याशी असहमती दर्शवली. अखेरीस ‘टीम बी’कडून सागर आणि सचिन यांची नावं पुढे आली.

यानंतर करण आणि रुचिता यांच्यात टास्कबाबत शांतपणे चर्चा झाली. करणने रुचिताला समजावून सांगितल्यानंतर रुचिताने थेट संपूर्ण महाराष्ट्रासमोर करणची माफी मागितली. हा क्षण भावनिक ठरला.

तन्वी–आयुष संवाद, नात्यांवर चर्चा

Bigg Boss  एपिसोडमध्ये दुसऱ्या बाजूला तन्वी आणि आयुष यांच्यातील संवादानेही लक्ष वेधून घेतलं. तन्वीने आयुषची नजर काढत स्पष्टपणे सांगितलं, “मी पझेसिव्ह आहे. मला माझ्या मित्राने दिवसातले किमान दोन तास माझ्यासोबत बोलावं. पण तू माझ्यासोबत बोलत नव्हतास, त्यामुळे माझी चिडचिड होत होती.” या संवादामुळे घरातील नात्यांची गुंतागुंत समोर आली.

गंभीर आरोपांनी पेटलेलं घर

पापडाच्या टास्कदरम्यान राकेशने दीपालीला सांगितलं की रुचिताने त्याच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला. हा गंभीर आरोप दीपालीने थेट रुचितापर्यंत पोहोचवला. यानंतर दुसऱ्या दिवशी रुचिताने यावरून प्रचंड राडा केला.

रुचिता आणि दीपाली यांच्यात राकेशवरून जोरदार वाद झाला. दीपालीला रडू कोसळलं. यावेळी रुचिता संतापात म्हणाली, “हिंमत असेल तर हात लावून दाखव.” या वक्तव्याने वाद अधिकच चिघळला. रुचिता पुन्हा आकांडतांडव करताना दिसली. तिचा तन्वीसोबतही पुन्हा वाद झाला.

रुचिता नंतर राकेशशी थेट बोलायला गेली, मात्र राकेशने स्पष्ट केलं की, “हे सगळं ‘भाऊच्या धक्क्या’वरच बोललं जाईल.” यानंतर सागर, करण आणि सचिन यांनी राकेशच्या भूमिकेवर चर्चा केली.

कॅप्टनसी टास्क : मोत्यांच्या हाराची चुरस

दुसऱ्या दिवशी सकाळी Bigg Boss  ने सागर आणि सचिन यांच्यात कॅप्टनसीसाठी खास टास्क जाहीर केला. पाण्यात असलेले मोती चोरून हार बनवायचा आणि तो डान्सर्सना विकायचा असा हा टास्क होता. दोन्ही टीममध्ये तीन-तीन सदस्य होते, तर राकेश आणि विशाल संचालकाच्या भूमिकेत होते.

सागरच्या टीममध्ये अनुश्री, दीपाली आणि रोशन होते, तर सचिनच्या टीममध्ये प्राजक्ता, प्रभू आणि विशाल होते. पहिला बझर वाजताच ओमकारने गोल्डन मोती घेत डान्स सुरू केला. या दरम्यान दोन्ही टीमचे सदस्य मोती आणण्यात व्यस्त झाले. विशालने सागरच्या टीममधील मोती खेचून घेतल्याने पुन्हा गोंधळ झाला आणि अनुश्री व सागरच्या हाताला रशी लागली.

पहिल्या फेरीत सागरने बाजी मारली. दुसऱ्या फेरीत टीम्स बदलल्या आणि सचिनने विजय मिळवला. त्यामुळे आता उद्याच्या फेरीत चोरावर शिरजोर ठरून कोण Bigg Boss  चा कॅप्टन होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

पुढे काय?

गंभीर आरोप, भावनिक उद्रेक आणि कॅप्टनसीची चुरस यामुळे ‘बिग बॉस मराठी ६’चा हा आठवडा अत्यंत वादळी ठरणार आहे. राकेश–रुचिता वादावर बिग बॉस काय निर्णय घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

read also : https://ajinkyabharat.com/bigg-boss-marathi-6-update-ruchita-rakeshs-promise-fans-are-stunned-to-see-the-spectacle/

Related News