अकोट : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळघाटच्या निसर्गसंपदेचा आणि आदिम संस्कृतीचा जवळून अनुभव देणारा नरनाळा महोत्सव यंदा दि. १५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज याबाबत माहिती देत महोत्सवाच्या तयारीला वेग देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.
या महोत्सवाच्या माध्यमातून मेळघाटचे वनवैभव, ऐतिहासिक वारसा आणि आदिवासी परंपरा नागरिकांसमोर उलगडणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जंगल सफारी, साहसी खेळ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असल्याने पर्यटकांसाठी हा एक खास पर्व ठरणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक दिवशी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून प्रसिद्ध कलावंतांची उपस्थिती हे यंदाच्या महोत्सवाचे मोठे आकर्षण असणार आहे.
लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’, ऐतिहासिक सादरीकरणासाठी प्रसिद्ध ‘शिवशंभू गर्जना’, तसेच सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांची लाईव्ह कॉन्सर्ट यामुळे महोत्सवाची रंगत अधिक वाढणार आहे. या कार्यक्रमांमुळे जिल्ह्यासह राज्यभरातील नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Related News
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वाशिममध्ये मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा
ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-अजितदादा जिंकले; संजय राऊतांचा गंभीर आरोप
सणासुदीत मोठी खुशखबर! खाद्यतेलावरील आयात शुल्कात केंद्राची मोठी कपात
शेतात मेटल डिटेक्टर लावल्यावरून Rohit Pawar आक्रमक; मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा
निवडणूक आयोगातील ‘14 आक्षेप’ समोर येताच Raj Thackeray आक्रमक; म्हणाले, ‘कर्ताकरविता कोण?’
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तीन दिवसांत दुष्काळाची अधिसूचना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
MPSC विद्यार्थ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नबाबत म्हणाले…
Manoj Jarange Patil यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी; आयकर विभागाच्या रडारवर कोण?
पुण्यात 150 गणेश मंडळांना लक्ष्मी रस्त्यावर मिरवणुकीची परवानगी नाकारली; रवींद्र धंगेकर आक्रमक
Weather Update : देशावर पुन्हा पावसाचं संकट; महाराष्ट्रासाठीही IMDचा मोठा इशारा
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे; अमित आझाद यांचे प्रतिपादन
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री भरणे
निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमींसाठीही विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. निसर्ग निर्वाचन संकुल, शहानूर येथे जंगल सफारी, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंग यांसारख्या रोमांचक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तर पोपटखेड धरण परिसरात नौकाविहार, बोटिंग आणि झॉर्बिंग वॉटर बॉल यांसारख्या जलक्रीडा पर्यटकांना अनुभवता येणार आहेत. पक्षीनिरीक्षण, गड भटकंती आणि छायाचित्र प्रदर्शन या उपक्रमांमुळे निसर्ग आणि इतिहासाचा संगम अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
याशिवाय आदिवासी नृत्यकलेचे सादरीकरण हे महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. मेळघाटातील पारंपरिक जीवनशैली, लोकसंस्कृती आणि कला यांचे दर्शन घडवून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता सांस्कृतिक देवाणघेवाणीचे महत्त्वपूर्ण माध्यम ठरणार आहे.
महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी आणि विविध माध्यमांद्वारे माहिती सर्वदूर पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. पर्यटकांच्या सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजनावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऐतिहासिक वैभव आणि वनसमृद्धीने नटलेला नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्याचा अभिमान असून, या महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या अनोख्या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
