कुरणखेड – २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मोटर वाहन विभागाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याद्वारे पथकाला त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला रवींद्र भुयार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मोहम्मद समीर मोहम्मद याकूब, तसेच मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. पथकाने रस्ता सुरक्षा अभियानात सक्रिय सहभाग घेऊन जनजागृती केली असून, अपघात ग्रस्तांना तत्परतेने मदत पोहोचवली आहे. यासाठी त्यांचे कौतुक करत सर्व टीमला प्रशस्तीपत्रकाने गौरविण्यात आले.
सन्मानित पथकात प्रमुख योगेश विजयकर, विजय माल्टे, शहबाज शाह, सैय्यद माजिद, शुभम कातखेडे, मोहन वाघमारे, शेख नजीर, उमेश माल्टे, अक्षय मोरे, हर्षल देवरनकर, शेख मोईन, दिनेश श्रीनाथ, शेख वसीम, गणेश धानोरकर, प्रथम बरडे यांचा समावेश होता.
Related News
बारामतीत प्रजासत्ताक दिनी वादग्रस्त घटना: नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक, बाबासाहेबांचा फोटो दुर्लक्षित
बारामतीत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ता...
Continue reading
पोपटखेड पथकाने धाडस, समर्पण आणि सेवाभाव दाखवत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात प्रेरणा दिली
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या पोपटखेड येथील वीर एकलव्य आपत्कालीन शोध व ब...
Continue reading
मुर्तिजापूरचे स्थानिक उपविभागीय अधिकारी (SDO) संदीप कुमार आपार यांनी भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) माध्यमातून आंतरराष्ट्रीय निवडणूक परिषदेत ...
Continue reading
आयअँडबी मंत्रालयाचा प्रजासत्ताक दिनाचा टॅब्लो: ‘भारत गाथा’साठी संजय लीला भन्साळी आणि श्रेया घोषाल एकत्र
२६ जानेवारी २०२६ रोजी देशभरात साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये...
Continue reading
वाडेगाव : भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय अधिवेशन ओडिशा राज्यातील कटक येथे दि....
Continue reading
अकोला – ग्राहक संरक्षण संघ खेडकर नगरच्या कार्यालयात स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सभेचे अध्यक्ष सुधाकर गाडगे...
Continue reading
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसह अकोला महापालिकेची निवडणूक आज सुरू झाली आहे. अकोला पश्चिमेचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी लक्...
Continue reading
अकोला, १५ जानेवारी: अकोला महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक १८ मधील शहा बाबू हायस्कूल येथील मतदान केंद्रावर एक हृदयद्रावक घटना...
Continue reading
https://youtu.be/0fK1K6dPyqw?si=fwg4hRr1JgrnWWZH
अकोल्यात मकरसंक्रांतच्या दिवशी पतंग उडवण्याच्या छंदामुळे गंभीर अपघात घडला आहे. अकोल्यात...
Continue reading
मूर्तिजापूर प्रतिनिधी:माना ते कुरुम रेल्वे स्थानक दरम्यान, ग्राम रामटेक जवळील डाऊन रेल्वे लाईनवर ११ जानेवारीच्या रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा दुर्दैवी मृत्यू ...
Continue reading
प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून हा सन्मान स्थानिक नागरिकांना रस्ता सुरक्षितता नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला. पथकाच्या धैर्यपूर्ण कार्यामुळे समाजात जनजागृती वाढली असून, आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने मदत पोहोचवण्याचे आदर्श पथक म्हणून त्यांचे उदाहरण दिले जाते.
हा सन्मान सोहळा कुरणखेड परिसरात सुरक्षिततेबाबत जनजागृती आणि आपत्कालीन सेवा कार्याची महत्ता अधोरेखित करणारा ठरला.
read also: https://ajinkyabharat.com/murtijapur-police-takes-major-action-against-motorcycle-theft-thieves-stuck-in-both-states/