डॉ. सुगत वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण
अकोट : भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सम्यक संबोधी संस्थेत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी, सम्यक संबोधी संस्था व अजिंक्य भारत यांच्या संयुक्त विद्यमाने सम्यक संबोधी सभागृह प्रांगणात आयोजित कार्यक्रमात डॉ. सुगत वाघमारे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत गायन झाले.
यावेळी सम्यक संबोधी संस्थेचे उपाध्यक्ष अजय आठवले, सचिव राहुल ओइंबे, ज्येष्ठ सदस्य एस. टी. वानखडे, लबडे साहेब, अहिर साहेब, प्रशांत तेलगोटे, दांडगे, पंकज खंडारे, रवी शिरसाठ, परशुराम तेलगोटे, रवी डोंगरे, अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम (I.A.S.) आदींसह तिक्ष्णगत सोसायटीचे सचिव विष्णुदास मोंडोकार, सचिन पाटील, तसेच अजिंक्य भारतचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात ज्येष्ठ सदस्य एस. टी. वानखडे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर डॉ. सुगत वाघमारे यांनी आपल्या मनोगतात संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत “आपण प्रथम भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीयच आहोत” असा मोलाचा संदेश दिला.
Related News
अकोट, २६ जानेवारी: अकोट तालुक्यातील रूईखेड येथील नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे चालविले जाणारे श्री बागाजी विद्यालय आणि श्रीराम का...
Continue reading
Republic Day Parade 2026 Live अंतर्गत आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या कर्तव्य पथाकडे लागले आहे. आज भारत आपला 77 वा प्रजासत्ताक दि...
Continue reading
Republic Day 2026 साजरा करताना भारताने 77वा प्रजासत्ताक दिवस भव्यपणे साजरा केला. जाणून घ्या 26 जानेवारी 1950 पासून आजपर्यंतचा इतिहास, महत्व आ...
Continue reading
अकोट: अखेर, अकोट महापूर प्राधिकरणाने शहरातील पाईपलाईनवरील लिकेज दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा गढूळ आणि दुर्गंधीयुक्त होत असल्यामुळे नागरिकां...
Continue reading
अकोट :विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे व त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अकोटच्या वतीने शहरातील ल...
Continue reading
अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथील श्री नागास्वामी इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण...
Continue reading
अकोला:
शैक्षणिक आणि सामाजिक संदेश देत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. 'तिक्ष्णगत ...
Continue reading
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
read also : https://ajinkyabharat.com/lifers-marriage-7-shocking-truths-about-lifers-marriage-powerful-but-controversial-marriage/