चान्नी पोलिसांची कारवाई: अवैधरित्या पेट्रोल वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

पेट्रोल

चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरीत्या पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. १९ जानेवारी रोजी उमरा परिसरात ऑपरेशन प्रहार अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. ठाणेदार रवींद्र लांडे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, खामगाव तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथून उमरा गावाकडे दोन इसम दुचाकीवर अवैध पेट्रोल वाहतूक करत आहेत.

पोलिसांनी त्वरित सापळा रचून दुचाकी अडवली. तपासात सावरगाव येथील कविश्वर जगराम आडे आणि नितेश वामन आडे यांच्याकडून प्लास्टिक कॅनमध्ये एकूण ३५ लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले. याशिवाय दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईत जप्त केलेल्या पेट्रोल व दुचाकीचा एकूण मूल्य ४३,८५० रुपये इतका आहे.

या प्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व भारतीय दंडसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत बी. रेड्डी व बाळापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या देखरेखीखाली ठाणेदार रवींद्र लांडे, सुदर्शन चौरे आणि शिवनंद स्वामी यांनी केली.

Related News

स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की, अवैधरित्या पेट्रोल विक्री करण्यासाठी ही वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई केली गेली. या कारवाईमुळे परिसरात अवैध पेट्रोल पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/akot-school-annual-love-conference-2026-colorful-program-of-gurumauli-sane-guruji-and-meenakshi-vidyalaya/

Related News