अकोला :
अकोला शहरातील सीताबाई कला महाविद्यालयातील पिंक मतदान केंद्र क्रमांक १२ वर आज मतदानादरम्यान ईव्हीएम मशीन सुमारे दहा मिनिटे बंद पडल्याची घटना घडली. रूम क्रमांक तीनमध्ये असलेल्या या मशीनवर दोन मतदारांनी मतदान केल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना काही काळ तात्काळ थांबावे लागले.
घटनेची माहिती मिळताच निवडणूक कर्मचारी आणि तांत्रिक पथकाने मशीनची तपासणी केली. सुमारे दहा मिनिटांच्या तपासणीनंतर ईव्हीएम पूर्ववत सुरू करण्यात आली आणि मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली. मात्र या प्रकारामुळे काही काळ मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता.
दरम्यान, संबंधित मतदान रूमवर स्पष्ट क्रमांक लावण्यात न आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे मतदान प्रतिनिधी निलेश अरखराव यांनी केला आहे. अशा त्रुटींमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Related News
विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला निकाल
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोल्यात; 1 हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण!
ठाकरे गटाला मोठा धक्का; सोमनाथ ओझर्डेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, शिंदे गटाचीही चिंता वाढली!
अकोल्यात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; धमकीच्या फोननंतर घडली धक्कादायक घटना , 5 मिनिटांत संपलं आयुष्य!
अकोला शिक्षक बदली घोटाळा: 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली | 136 दोषींवर मोठी कारवाई
अवैध जात प्रमाणपत्रामुळे अकोला महापालिकेतील 3 नगरसेवक अपात्र; राजकारणात मोठी खळबळ
काँग्रेस आमदाराला बिश्नोई गँगची धमकी; ‘बाबा सिद्दीकींसारखा गेम करू’ ; 10 कोटींच्या खंडणीची धमकी!
10 हजारांची लाच घेताना मुद्रांक जिल्हाधिकारी रंगेहात; ACB ची धडाकेबाज कारवाई, किरण चौधरी अटकेत
धक्कादायक! शाळा अध्यक्ष, निलंबित मुख्याध्यापक व शिक्षकाच्या मानसिक छळाला कंटाळून प्रभारी मुख्याध्यापकाची शाळेत गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईट नोटमध्ये तिघांवर गंभीर आरोप
अकोला-वाडेगाव रोडवर भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, चार जण जखमी
MLC Election Result 2026: महायुतीला मोठा धक्का! सांगली-साताऱ्यात 100 मतांची फूट, 301 मतांनी धैर्यशील कदमांचा दमदार विजय
खामगाव रोडवर भीषण अपघात; कारंजा रमजानपूर येथील व्यावसायिकाचा जागीच मृत्यू
निवडणूक प्रशासनाने मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करत, ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असून मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचा दावा केला आहे.
“पिंक मतदान केंद्रात ईव्हीएम अचानक बंद पडली, त्यामुळे मतदारांना थांबावे लागले. शिवाय संबंधित रूमवर क्रमांक लावलेला नव्हता, यामुळे गोंधळ निर्माण झाला. अशा निष्काळजीपणामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.”
