बोरगाव मंजू जि.प. शाळा मुख्याध्यापक साहेबराव मोरडे यांचा भावपूर्ण निरोप व सत्कार

मुख्याध्यापक

बोरगाव मंजू  – जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ चे मुख्याध्यापक साहेबराव मोरडे यांची नुकतीच बदली झाल्याने शालेय समिती आणि पालक वर्गाच्या वतीने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. या वेळी मोरडे गुरुजींचा त्यांच्या पत्नीसह शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख कोथळकर मॅडम होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक सौ. साकरकर, आरती बंड आणि सौ. हडपे उपस्थित होत्या. यावेळी शाळेतील शिक्षक वृंद, मोठ्या संख्येने पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

केंद्रप्रमुख कोथळकर यांनी भाषणात मोरडे सरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. “एक शिस्तप्रिय आणि अभ्यासू शिक्षक म्हणून मोरडे सरांनी शाळेच्या विकासासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी मोरडे सरांच्या नेतृत्वाखाली शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीत झालेल्या बदलांची माहितीही उपस्थितांना दिली.

Related News

साहेबराव मोरडे यांनी या सत्काराला भावूक होऊन आपल्या कार्यकाळात लाभलेले सहकार्य आणि विद्यार्थ्यांशी जडलेले नाते याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थित पालकांनीही मोरडे सरांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. हडपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. साकरकर यांनी केले. यावेळी उपस्थितांसाठी स्वादिष्ट भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. या भावनिक निरोप कार्यक्रमातून मोरडे सरांच्या शैक्षणिक योगदानाचे महत्त्व स्पष्ट झाले आणि शाळा व ग्रामस्थांच्या मनात त्यांची आठवण कायम राहणार आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/national-mother-rajmata-jijau-jayanti-enthusiasm-celebration-at-nimba-phata/

Related News