माना पोलिसांनी गोवंश तस्काराच्या आवळल्या मुसक्या.!

कत्तलीसाठी

कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या दोन गोवंशांना माना पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवदान

माना परिसरात गोवंश मास विक्री जोमात सुरू असल्याची जनसामान्यातून चर्चा

मुर्तीजापुर तालुक्यात गोवंश तस्करी व मास विक्रीचा व्यवसाय मोठ्या जोमाने सुरू आहे.

Related News

मागील काही दिवसात झालेल्या कारवायांवरून हे  दिसून आले आहे.

विशेषतः माना परिसरात अनेक वर्षापासून सुरू असलेला

गोवंश मास विक्रीचा धंदा जोरात सुरू असून यावर बंदी असताना सुद्धा

गोवंश तस्करांचा मात्र राजरोसपणे मास विक्रीचा धंदा सुरू आहे.

अशातच बुधवार 17 जुलै रोजी एकादशीच्या दिवशी मुर्तीजापुर तालुक्यातील

माना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात दोन गोवंश बैल

कत्तलीसाठी नेत असताना आरोपीसह ताब्यात घेतल्याची कारवाई

माना पोलिसांकडून करण्यात आली. माना पोलिसांच्या सतर्कतेमुळे

एकादशीच्या दिवशी दोन बैलांना जीवदान मिळाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोहम्मद शारीक शेख अकबर कुरेशी,

रा. माना याला माना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी माना पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार,

५,५ (ब) ९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाई ठाणेदार सुरज संभाजी सुरोशे यांचे मार्गदर्शनाखाली

जयकुमार मंडावरे, पंकज वाघमारे, उमेश हरमकर यांनी केली.

Read also: https://ajinkyabharat.com/joe-biden-corona-positive-in-the-midst-of-us-presidential-election/

Related News