अग्निवीरांसाठी हरियाणा सरकारची मोठी घोषणा!

हरियाणाचे

नोकरीत १० टक्के आरक्षण; ५ लाखाचे बिनव्याजी कर्ज!

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अग्निवीरांसाठी मोठी घोषणा केली आहे.

सैनी म्हणाले, अग्निवीरांना शासकीय नोकरीत १० टक्के आरक्षण मिळेल.

Related News

आमचं सरकार हरियाणामधील अग्निवीरांना राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या

विशिष्ट नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची घोषित करत आहे.

याअंतर्गत पोलीस हवालदार, मायनिंग गार्ड, फॉरेस्ट गार्ड,

जेल वॉर्डन व एसपीओ पदांसाठी अग्निवीरांची थेट भरती केली जाईल.

अग्निवीरांना गट क आणि गट ड मधील सरकारी पदांसाठी

विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट दिली जाईल.

परंतु, अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला पाच वर्षांची सवलत दिली जाईल.

गट क मधील नागरी विभागातील नोकऱ्यांमधील

भरतीत अग्निवीरांसाठी पाच टक्के आरक्षण, गट ड मध्ये एक टक्का

आरक्षण दिलं जाणार आहे. जे कारखाने अथवा उद्योग

अग्निवीराला दरमहा ३० हजार रुपये किंवा त्याहून अधिक पगार देतील

त्या कारखान्यांना, उद्योगांना हरियाणा सरकार वार्षिक ६० हजार रुपये अनुदान देईल,

अशी माहिती मुख्यमंत्री सैनी यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले, गट क मधील भरती करताना

अग्निवीरांसाठी ५ टक्के जागा राखीव असतील.

तसेच जे अग्निवीर चार वर्षांच्या सेवेनंतर परततील,

त्यांना जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर

सरकार त्यांना ५ लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज देईल.

दरम्यान, सीआएसएफ, बीएसएफ, सीआरपीएफ व एसएसबीच्या

प्रमुखांनी अग्निवीरांसाठी आरक्षणाची घोषणा केली होती.

माजी अग्निवीरांना निमलष्करी दलांमध्ये १० टक्के आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे.

तसेच वयोमर्यादा व शारीरिक चाचणीतही सुट दिली जाणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/sanjay-shirsat-should-expand-the-cabinet/

Related News