महामृत्युंजय मंत्राचा जप आणि हवन!
नुकतेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. पेनसिल्व्हेनिया येथे
Related News
एका निवडणूक रॅलीत एका व्यक्तीने ट्रम्प यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
ही गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागून गेली असली तरी,
अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर झालेल्या अशा हल्ल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
एवढेच नाही तर भारतातील सर्वसामान्य जनताही ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत असून,
त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीसाठी हिंदू सेनेने विशेष ‘हवन’ आयोजित केला होता.
एकता आणि समर्थनाच्या भावनेने, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
यांचे कल्याण आणि दीर्घायुष्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने
नवी दिल्लीत हिंदू सेनेने भव्य ‘हवन’ आयोजित केला होता.
दिल्लीतील दिलशाद गार्डनमधील माँ बगलामुखी शांती पीठ येथे हा विधी पार पडला.
या हवनाच्या माध्यमातून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
लवकरात लवकर बरे व्हावे आणि दीर्घायुष्य मिळावे यासाठी हिंदू सेनेने प्रार्थना केली आहे.
हिंदू सेनेने दिल्लीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी महामृत्युंजय जाप हवन यज्ञ केला.
या यज्ञावेळी पवित्र महामृत्युंजय मंत्राचा 1.25 लाख जप केला.
या मंत्राद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी
आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.