अमरावती ते पंढरपूर विशेष गाडीचे अकोल्यात स्वागत

आशाढी

आषाढी एकादशीच्या उत्सवात दरवर्षी हजारो भाविक पंढरपूरला

श्री विठ्ठल दर्शनासाठी जातात, यादृष्टीने मध्य रेल्वे विभागाने

१७ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याला

Related News

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वतीने अमरावती ते पंढरपूर दरम्यान

वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाडी १३ जुलै रोजी

अकोला येथून जात असताना या गाडीचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे.

ही गाडी उद्या पंढरपूरला पोहोचेल.

तर १६ जुलै रोजी सायंकाळी ४.२० वाजता ही गाडी पंढरपूरहून

भाविकांसह अमरावतीसाठी सुटेल.

विदर्भातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये,

यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने चांगले नियोजन केले आहे.

ही गाडी आज १३ जुलै रोजी अमरावतीहून निघून दुपारी ४.२० वाजता अकोल्याला पोहोचली.

यावेळी या गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले

व लोको पायलट व चालक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

यावेळी विमल जैन, ऍड. राजनारायण मिश्रा, उप एस.एस.रवि ठोंबरे,

प्रदीप शर्मा, ह.भ.प. सौ प्रतिभा गिरी, दिलीप गिरी, भुवन जैन,

दीपक गवई यांच्यासह वारकरी गण उपस्थित होते.

Read also: https://ajinkyabharat.com/jhomatoche-founder-deepinder-goyal-joins-abjadheeshanya-club/

Related News