पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी

अकोला

अकोला काँग्रेस कमिटीची मागणी.. 

अकोला शहरातील गंगानगर, शिवसेना वसाहत, नाजूक नगर मरगट,

इक्बाल कॉलनी, संजय नगर, नायगाव, अकोट फैल, कौलखेड येथे

Related News

०७/०७/२०२४ व ०८/०७/२०२४ रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे

सदर परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने

घरातील साहित्य, अन्नधान्य, जनावरांचा चारा पावसाच्या पाण्यात भिजून वाहुन गेल्यामुळे

सदरील नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी सदरील मार्गात पक्क्या स्वरूपाच्या

नाल्या नसल्यामुळे या भागात पडणारे पाणी मिळेल त्या दिशेने वाहत जाऊन नागरिकांच्या घरात शिरते.

या भागात पक्क्या स्वरूपाच्या नाल्या बांधणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे

०९ जुलै २०२४ रोजी मनपाचे माजी विरोगी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली

अकोला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने महानगरपालिका आयुक्त

डॉ. सुनील लहाने यांना निवेदन देण्यात आले,

वास्तविक शासनाकडून दरवर्षी मिळणारा नगरोत्थान निधी

व दलितेत्तर निधी हा सर्वांत जास्त अकोला पूर्व क्षेत्रामध्ये देण्यात येत आहे.

तसेच अकोला मनपाला प्राप्त झालेला हदवाढ़ निधी हा सुद्धा अकोला पूर्व भागात वितरीत करण्यात आला आहे.

त्यामुळे अकोला पश्चिम भागाचा विकास थांबलेला असून,

वरीलप्रमाणे नमूद भाग हा अकोला पश्चिम भागात येत असल्यामुळे या भागात

सर्वात कमी विकासकामे झालेले असून,

पक्के रस्ते व नाल्या बांधण्यास पुरेसा निधी मिळत नाही.

त्यामुळे दरवर्षी ढगफुटी सदृ‌श पाऊस झाल्यास त्याचा सर्वात जास्त परिणाम याच भागाला होतो.

त्यामुळे सन २०२४-२५ करिता शासनाकडून मिळणारा नगरोत्थान निधी

व दलितेतर निधी हा अकोला पश्चिम भागातील विकासकामांकरिता

देण्यात येवून त्या निधी अंतर्गत शहरातील गंगानगर, नायगाव,

अकोट फैल, कौलखेड या भागात नाल्याचे बांधकाम करण्यात यावे.

तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून

पीडितांना त्वरित आर्थिक सहाय्य करण्यात याचे,

अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनातील मागण्या मान्य न झाल्यास तत्काळ तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल,

असा इशारा देण्यात आला.

Read also: https://ajinkyabharat.com/special-train-from-akola-for-devotees-going-to-pandharpurla/

Related News