डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेसाठी अनुयायी आग्रही

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक

भूसंपादन जनआंदोलन समिती चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमरावती मधे इर्विन चौक परिसरात असलेल्या

Related News

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

स्मारकाच्या जागेचा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे.

जागेच्या संदर्भात उच्च न्यायालयात

प्रशासनाच्या वतीने नेमण्यात आलेले वकील

हे कोणत्याच तारखेवर हजर राहत नसल्याचे

आंबेडकरी संघटनांचे म्हणणे आहे.

जिल्हाधिकारी व मनपा प्रशासन हे

हेतुपुरस्सर या जागेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

संघटनांनी केला आहे.

त्यामुळे दहा दिवसांमध्ये जागेचा प्रश्न निकाली निघाला नाही,

तर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,

असा इशारा मंगळवारी निवेदनातून दिला.

यावेळी सुदाम बोरकर, राजेश वानखडे, मनीष साठे,

सुनील रामटेके, रितेश तेलमोरे, गुड्डू इंगळे, अक्षय मते,

किरण गुडधे, बंटी रामटेके, रविकांत गवई,

दीपक सरदार, सिद्धार्थ गायकवाड, बाबाराव धुर्वे,

उमेश इंगळे, अंकुश आठवले, गौतम गळवींसह

आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read also: https://ajinkyabharat.com/marathwada-vidarbha-earthquake/

Related News