धरण क्षेत्रातील रिमझिम सरींचा परिणाम
जिल्ह्यात बहुतांश भागात जून महिना कोरडाच गेला.
आता कुठे पाऊस हजेरी लावत आहे.
Related News
त्यामुळे धरणामध्ये आवक होत आहे.
वाशिम जिल्ह्यात पाऊस होत असल्याने पाणीसाठा हळूहळू वाढत असून
काटेपूर्णा प्रकल्पाचा जलसाठा चार टक्क्यांनी वाढला आहे.
गेली महिनाभर पावसाची उघडझाप सुरू होती.
दरम्यान जून महिन्यातील सरासरीपेक्षा कमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे.
त्यामुळे अकोला शहरांची तहान भागविणाऱ्या काटेपुर्णा प्रकल्पाने
जून महिन्यात तळ गाठला होता.
जून महिन्याच्या अखेर काटेपूर्णा धरणात ११ टक्के जलसाठा शिल्लक होता.
त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह नागरिकांसमोर
संभावित पाणी टंचाईचा प्रश्न होता.
प्रकल्प भरण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाची गरज होती .
दरम्यान जून महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले .
मात्र जुलै महिन्यात पावसाचे कमबॅक झाले असून
अकोला जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यात दमदार हजेरी लावली.
शनिवारी काटेपूर्णा धरण क्षेत्रात पाऊस असल्याने
पाणी साठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे.
नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून,
रविवारी धरणाची पातळी १५.३४ टक्के आहे.
गेली महिनाभर पावसाची उघडझाप सुरू असल्याने
जून महिन्यातील सरासरीच्या निम्मे टक्के पावसाची नोंद झाली आहे.
वाशिम जिल्ह्यासह अकोला जिल्ह्यात जूनची सरासरी ओलांडली असून,
रविवारी धरण क्षेत्रात ५५ मिलीमीटर पाऊस झाला.
आतापर्यंत या क्षेत्रांवर १८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
त्यामुळे धरणाऱ्या पाणी पातळीत चार टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती
काटेपुर्णा प्रकल्पांचे अधिकारी कुलकर्णी यांनी दिली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/block-the-movement-of-citizens-in-akola-juneshehar-complex/