अकोला जूनेशहर परिसरातील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन.

पावसामुळे

पावसामुळे नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याने नागरिक संतप्त

प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा नागरिकांचा इशारा

अकोल्यातील जुनेशहर भागातील नागरिकांच्या घरात

Related News

नाल्याचे पाणी शिरत आसल्याने संतप्त नागरिकांनी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील किराणा मार्केट समोर रास्तारोको केला.

महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे रुंद नाला अरुंद झाला आहे,

त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वारंवार महापालिकेला काळवल्यावरही कोणतीच कारवाई न केल्याचा आरोप

यावेळी नागरिकांनी केला आहे.

जो पर्यंत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त येणार नाहीत

तो पर्यंत रास्तारोको करू असा इशारा नागरिकांनी दिलाय.

यावेळी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.

वाहनांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या,

परंतु यावेळी संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देत माणुसकीचा प्रत्यय दिला.

Read also: https://ajinkyabharat.com/raigad-fort-closed-for-tourists-from-today/

Related News