तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस)
६ विधानपरिषदेच्या आमदारांनी गुरुवारी रात्री काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Related News
त्यामुळे भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री
के. चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत बीआरएसच्या या सहा आमदारांनी
पक्षप्रवेश केला आहे.
गेल्या वर्षी तेलंगणामध्ये विधानसभेची निवडणूक झाली होती.
या निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर के. चंद्रशेखर राव यांना धक्यावर धक्के बसत आहेत.
आता बीआरएसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांमध्ये दंडे विठ्ठल,
भानू प्रसाद राव, एमएस प्रभाकर, बसवाराजू सरैया, बोग्गारापू दयानाद
आणि येगे मल्लेशम यांचा समावेश आहे.
या आमदारांच्या काँग्रेसमधील पक्ष प्रवेशावेळी काँग्रेसच्या प्रभारी
दीपा दास मुंशी यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.
दरम्यान, तेलंगणा विधानपरिषदेत बीआरएसचे २५ सदस्य आहेत.
मात्र, बीआरएसच्या विधानपरिषदेतील ६ आमदारांनी
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची ताकद आणखी वाढली आहे.
विधानपरिषदेतील काँग्रेसच्या आमदारांची संख्या चारवरून आता दहावर पोहचली आहे.
माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे विश्वासू समजले जाणारे
केशव राव यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
केशव राव हे राज्यसभेवर खासदार होते.
मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर केशव राव यांनी खासदारकीचा
राजीनामा दिला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते.
दिल्ली दौऱ्यावरून तेलंगणात दाखल झाल्यानंतर गुरुवारी रात्री
बीआरएसच्या सहा आमदारांनी मध्यरात्रीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
के. चंद्रशेखर राव हे दोन पंचवार्षिक सत्तेत राहिले.
मात्र, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बीआरएसचा दारुण पराभव झाला.
बीआरएसला ११९ पैकी फक्त ३९ जागा मिळाल्या होत्या.
त्यामधूनही निवडणुकीनंतर काही आमदारांनी बीआरएससोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता.
यानंतर आता विधानपरिषदेतील सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे
बीआरएस पक्षासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/labor-party-in-britain-sattever-after-14-years/