हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राष्ट्रपतींना निवेदन!

राहुल गांधी यांच्या

राहुल गांधी यांच्या हिंदू धर्मियांविषयीच्या वक्तव्यावरून

हिंदू जनजागृती समितीची राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी !

हिंदू जनजागृती समितीने अकोला जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत

Related News

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देऊन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हिंदू समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर

कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने

हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत

आणि देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

त्यामुळे हिंदू जनजागृती समितीने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व

तत्काळ रद्द करण्याची मागणी केली असून,

त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

हिंदू जनजागृती समितीने राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात,

राहुल गांधी यांनी हिंदू समाजाची सार्वजनिक

आणि बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे.

निवेदन देण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख योगेश अग्रवाल,

संजय ठाकूर, अधिवक्ता पवनेश अग्रवाल, सागर जोशी,

रवींद्र फाटे अध्यक्ष स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन, राजू मंजुळेकर,

श्रीराम भाऊ पांडे हिंदू महासभेचे अकोला अध्यक्ष, श्विनी सरोदे, अजय खोत

यांच्यासह हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते.

Read also: https://ajinkyabharat.com/strange-behavior-of-akolyat-district-primary-school/

 

Related News