हेमंत सोरेन यांनी केला सरकार स्थापनेचा दावा!
झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
Related News
दांडूके चालवा, बंदुका रोखा, आम्ही जाणारच! संजय राऊत यांचा सरकारला मोठा इशारा
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा; संसद भवन ते आयोगाच्या कार्यालयापर्यंत कडेकोट ...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांचा ‘खापर पणजोबा’ कुठून आला? फॉर्म-६च्या वादावर संजय राऊत आक्रमक; महाभियोग आणण्याची घोषणा निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेद आणि मतदार यादीच्या व...
Continue reading
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर; १ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ; कर्जमाफी लाभार्थी...
Continue reading
Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका, 4 निर्णय खूप महत्त्वाचे; विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट!
Maharashtra Cabinet Decision : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सचिवालयात आज, 2...
Continue reading
भोरमधील सबस्टेशन प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; प्रकल्प रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द द्यावा – सुप्रिया सुळे
भर पावसात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा
पुणे ज...
Continue reading
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? शिंदेंना आणखी एक मंत्रिपद मिळणार; धर्मेंद्र प्रधानांचीही पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता
केंद्रातील राजकीय वर्तुळातून सध्या मोठी बातमी समोर येत आ...
Continue reading
2029 आधीच पंतप्रधान, गृहमंत्र्यांचा बाजार उठेल; संजय राऊत यांचा घणाघात
अमित शाहांच्या दौऱ्यावरून भाजपला इशारा; मोदी-शाह, टिळक कुटुंब आणि भाजपवर राऊतांचा जोरदार निशाणा
ठाकरे गटाचे...
Continue reading
राहुल गांधींच्या त्या शब्दांनी भाजप संतापला! अनुराग ठाकूरांचा हक्कभंग प्रस्ताव; खासदारकी धोक्यात की केवळ राजकीय दबाव? NEET-UG पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन...
Continue reading
Anti Paper Leak Bill : रस्त्यावरच्या लढाईनंतर आज संसदेत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित मोठा निर्णय? पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारची मोठी तयारी
देशातील परीक्षा व्यवस्थेवर ...
Continue reading
धर्मेंद्र प्रधान राजीनाम्यानंतर प्रथमच संसदेत; सत्ताधारी खासदारांनी स्वागतासाठी केली गर्दी, विरोधकही आक्रमक
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा; संसदेच्य...
Continue reading
लोकसभा-राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ; घोषणाबाजीमुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित
नीट पेपरफुटी, विद्यार्थी आंदोलन आणि परीक्षा सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर संसदेत जोरदार राजकी...
Continue reading
पेपर अँटी-लीक विधेयक आज संसदेत; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारची मोठी कसोटी
पावसाळी अधिवेशनात परीक्षा व्यवस्थेवर निर्णायक चर्चा; पेपरफुटी रोखण्या...
Continue reading
बुधवारी रात्री उशिरा चंपाई सोरेन यांनी राजभवनात
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला.
यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे झारखंडचे प्रभारी गुलाम अहमद मीर
आणि मंत्री मिथिलेश ठाकूर उपस्थित होते.
त्यानंतर माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केला.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा हेमंत सोरेन विराजमान होणार आहेत.
झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील राज्यातील आघाडी सरकारच्या
सर्व आमदारांनी पक्षाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांना तिसऱ्यांदा झारंखडच्या मुख्यमंत्री करण्याची तयारी केली आहे.
हेमंत सोरेन यांनी जेएमएम, आरजेडी आणि काँग्रेस आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चंपाई सोरेन म्हणाले,
मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
हेमंत सोरेन यांची नेतेपदी निवड करण्यात आली
असून लवकरच नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
काही दिवसांपूर्वी मला मुख्यमंत्री करण्यात आले होते.
मला राज्याची जबाबदारी मिळाली होती.
आता हेमंत सोरेन परत आले आहेत.
आघाडीतील पक्षांनी निर्णय घेतला आहे की, हेमंत सोरेने आमचे नेते असतील.
मी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे, असे चंपई सोरेन यांनी सांगितले.
राज्यातील या राजकीय घडामोडीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत विसा यांनी एक्स वरून प्रतिक्रिया दिली आहे.
जेएमएम आणि काँग्रेसकडून एका वरिष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्री पदावरून हटवणे चुकीचे आहे.
झारखंडमधील लोक नक्कीच याचा विरोध करतील असे ते म्हणाले.
ईडीने केली होती अटक
हेमंत सोरेन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली होती.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही दिवस आधी
म्हणजे ३१ जानेवारी रोजी अटक होण्याच्या आधी
हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
जवळ जवळ पाच महिन्यांनी २८ जून रोजी त्यांना जामीन मिळाला.
उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
सोरेन यांच्यावर ३१ कोटींहून अधिक किमतीची ८.८६ एकराची जमीन
बेकायदेशीरित्या मिळवल्याचा आरोप आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/akher-samba-sub-division-branch-engineer-andolachenya-bhetila/