प्रतिनिधी : देवानंद खिरकर
अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५ मध्ये ई-पीक पाहणी न केलेल्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. ग्रामस्तरीय प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, या संधीचा लाभ घेऊन वेळेत अर्ज सादर करावा.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णय क्रमांक लवेसू–२०२५/शिकन/प्र.क्र.३/भूमापन, दिनांक १४ डिसेंबर २०२५ आणि जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांच्या पत्र दिनांक १६ डिसेंबर २०२५ नुसार, ई-पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑफलाइन पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व गावांमध्ये ही कार्यवाही कालबद्ध पद्धतीने राबविली जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे ई-पीक पाहणी करता आली नाही, त्यांनी दिनांक १७ डिसेंबर २०२५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज सादर करावा. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ग्रामस्तरीय समितीमार्फत दिनांक २५ डिसेंबर २०२५ ते ०७ जानेवारी २०२६ या कालावधीत शेतभेट, स्थळपाहणी व पंचनामे केले जातील.
Related News
दुष्काळात खचलेल्या शेतकऱ्यांना तुकाराम मुंढेंनी दाखवली नवी दिशा! दुग्ध व्यवसाय, हायड्रोपोनिक्सचा दिला मंत्र; सल्ला ठरणार गेमचेंजर?
Tukaram Mundhe To Farmers : दुष्काळ, पाण्याची टं...
Continue reading
मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांना ₹15,000 पर्यंत आर्थिक लाभ! PM-VBRY योजनेचा फायदा घेण्यासाठी हे काम करणे आवश्यक
PM-VBRY Scheme 2026 : केंद्र सरकारकडून देशातील रोजगाराला चालना देण्यासा...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार ५ हजार रुपये; दुष्काळग्रस्तांना तातडीचा दिलासा
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचा...
Continue reading
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून मोठ्या उपाययोजना
राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तीन दिवसांत दुष्काळाची अधिसूचना; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली ...
Continue reading
कांद्याचे बाजारभाव घसरले; आवक घटूनही दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
पिंपळगाव बसवंतमध्ये कमाल दर ८०० रुपयांनी घसरला; लासलगावात सरासरी ४०० तर येवल्यात ६०५ रुपयांची घट
कां...
Continue reading
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अकोल्यात कृषिमंत्र्यांचा सत्कार; पंचनामे आणि अहवाल...
Continue reading
राज्यात दुष्काळाचं सावट; पालकमंत्र्यांना शेतात जाऊन पाहणीचे आदेश, शेतकऱ्यांसाठी सर्वेक्षण सुरू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व विभागांना तातडीने कामाला लागण्याचे निर्देश; क...
Continue reading
5000 कोटींच्या दाव्यावरून लाडकी बहीण योजना चर्चेत; सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल, ‘खरी आकडेवारी कोणती?’
लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा मुद्दा ऐरणीवर; सुप्रिया सुळेंनी मागितल...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; करपलेल्या पिकांचे थेट शेतात जाऊन सर्वेक्षण, नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा
Maharashtra Farmer News : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिकांच...
Continue reading
जनधन योजनेबाबत धक्कादायक माहिती; 5.72 कोटी खात्यांमध्ये शून्य शिल्लक
प्रत्येक चौथ्या जनधन खात्यापैकी एक खाते निष्क्रिय; आरटीआयमधून समोर आली आकडेवारी, महाराष्ट्रातील 36.04 लाख खात्...
Continue reading
स्थळपाहणी नंतर अहवाल गावनिहाय एकत्रित स्वरूपात आवश्यक कागदपत्रांसह दिनांक ०८ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत संबंधित कार्यालयास सादर केला जाईल. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही संपूर्ण प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करणे अनिवार्य असून कोणत्याही प्रकारची दिरंगाई झाल्यास ग्रामस्तरीय समिती जबाबदार राहील.
अकोट तहसीलदारांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ही सुवर्णसंधी गमावू नका आणि वेळेत अर्ज सादर करून आपल्या पिकांची नोंदणी पूर्ण करावी. या संधीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे लाभ मिळतील आणि पिकांचे सरकारी नोंदणीत समावेश सुनिश्चित होईल.
या निर्णयामुळे ई-पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकांची नोंदणी करण्याची अंतिम संधी मिळाली आहे. ग्रामस्तरावर कार्यवाही निश्चित वेळेत पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांनी तात्काळ आवश्यक अर्ज करणे अत्यंत गरजेचे आहे.
read also : https://ajinkyabharat.com/keep-the-akot-akola-timings-as-before-otherwise-the-railway-will-be-closed/